पुणे : सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी सासरकडील नातेवाईकांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिजू खिस्तोफर जोसेफ (वय ३८, रा. निर्मला अपार्टमेंट, वडगावशेरी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत सिजू जोसेफ यांच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिजू इलेक्ट्रिशयन होते. ते सायंकाळी कामावरुन घरी आले. त्यावेळी घरात कोणी नव्हते. सिजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा : विधानपरिषदेसाठीच आबा बागुल यांची भाजप बरोबर जवळीक ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिजू यांनी खोलीचा दरवाजा बंद केला होता. कुटुंबीयांनी दरवाजा वाजविला. प्रतिसाद न दिल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा सिजू यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सासरकडील नातेवाईकांनी सिजू यांना त्रास दिल्याने ते गेल्याने काही दिवसांपासूण तणावात होते. नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या आईने दिली. आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.