पुणे : अल्पवयीन युवतीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी युवतीची नवी मुंबईतील खालापूर परिसरातून सुटका केली. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी पसार झाले.

याप्रकरणी यश कातुर्डे याच्यासह साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवतीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती अल्पवयीन आहे. गुरुवारी युवती आणि तिची आई धनकवडी भागातून निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. युवतीच्या आईला पिस्तूलासारखे दिसणारे शस्त्र दाखवून धमकावले. युवतीला धमकावून दुचाकीवर बसण्यास सांगितले. युवतीचे अपहरण करुन दोघे जण पसार झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : पुणे : ‘माननीयां’साठी ३८ कोटींच्या निधीचे वर्गीकरण! समाविष्ट गावांसाठीची तरतूद बाणेर-बालेवाडीसाठी वळविली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी आणि युवती ओळखीचे आहेत. एकतर्फी प्रेमातून तिचे अपहण केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी युवतीला घेऊन मुंबईला गेल्याची माहिती मिळाली. खालापूर परिसरातून आरोपी युवतीला घेऊन बसमधून पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक खालापूरला पोहोचले. पोलिसांनी युवतीची सुटका केली. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली.