पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीकडून १७ तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणाने धमकावून बलात्कार केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. प्रसाद सावंत (वय ३८, रा. रामबाग काॅलनी, कोथरुड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. या बाबत तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : मावळमधून निवडणूक लढविण्याची चर्चा असताना पार्थ पवार यांनी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणी आणि आरोपी सावंत यांची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. सावंतने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तिच्यावर त्याने बलात्कार केला. आर्थिक अडचण असल्याची बतावणी करून त्याने तरुणीकडून १७ तोळे सोन्याचे दागिने घेतले, तसेच तिच्याकडून ९४ हजार रुपये उकळले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा सावंतने धमकावले, मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अडागळे तपास करत आहेत.