पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सेवेतील कायम कर्मचाऱ्यांना सरसकट दहा टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. ही पगारवाढ १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा मागील १९ महिन्यांचा फरक मिळणार आहे. या निर्णयानुसार दरमहा किमान तीन हजार दोनशे रुपये ते कमाल १५ हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. या निर्णयाचा १२०० कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा दर तीन वर्षांनी बँक आणि कर्मचाऱ्यांमध्ये करार होत असतो. यानुसार यापूर्वी २०१९ मध्ये करार झाला होता. यंदा जाहीर केलेली पगारवाढ ही येत्या ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर जानेवारी २०२४ पासून नवीन पगारवाढ मिळणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. बँकेच्या संचालक मंडळाने एकमताने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : पुणे : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीवरून राज्य सरकार आणि राज्य प्रशासनाची परस्परविरोधी भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बँकेचा १०५ वा वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. बँकेची वाटचाल पुढील १५-२० वर्षांत कशी असेल, याबाबतचा आराखडा तयार करण्याचे बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सूचित केले. तसेच येत्या काळात बँकेचे नवीन अद्ययावत ग्रंथालय सुरू करण्याबाबत या वेळी घोषणा करण्यात आली.