पुणे : देशातील छोटे शॉपिंग मॉल घोस्ट मॉल बनू लागले आहेत अथवा रिकामे पडू लागले आहेत. ऑनलाइन खरेदी आणि मोठ्या शॉपिंग मॉलकडे ग्राहक वळू लागल्याने छोटे शॉपिंग मॉल बंद पडत आहेत. देशातील २९ शहरांतील एकूण १.३३ कोटी चौरस फूट क्षेत्रफळावर रिकामे मॉल आहेत. या रिकाम्या मॉलची संख्या वाढल्याने २०२३ मध्ये विकसकांना ६७ अब्ज रुपयांचा फटका बसला आहे.

हेही वाचा >>> कांद्याची निर्यात सुरू; तरीही दरात पडझड

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Priyanka Chaturvedi eknath shinde shrikant shinde
“श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप…”, प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली
Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी

नाइट फ्रँक इंडियाने देशातील रिटेल क्षेत्राचा थिंक इंडिया थिंक रिटेल २०२४ अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, देशातील प्रमुख बाजारपेठांमधील रिकाम्या मॉलचे एकूण क्षेत्रफळ २०२३ मध्ये ५९ टक्क्यांनी वाढले. एखादा मॉलमधील ४० टक्के दालने रिकामी असतील तर त्याला घोस्ट मॉल म्हटले जाते. दिल्लीत सर्वाधिक ५३ लाख चौरस फुटांचे रिकामे मॉल आहेत. त्यात गेल्या वर्षी ५८ टक्के वाढ नोंदविण्यात आली. त्याखालोखाल मुंबईत २१ लाख चौरस फुटांचे रिकामे मॉल असून, त्यात ८६ टक्के वाढ झाली आहे. बंगळुरूमध्ये २० लाख चौरस फुटांचे रिकामे मॉल असून, त्यामध्ये ४६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. हैदराबादमध्ये मात्र रिकाम्या मॉलमध्ये १९ टक्के घट झाली असून, ते ९ लाख चौरस फुटांवर आले आहेत. देशातील प्रमुख महानगरांचा विचार करता एकूण शॉपिंग सेंटरच्या संख्येत गेल्या वर्षी घट झाली. गेल्या वर्षभरात १६ शॉपिंग सेंटर बंद पडली. याचवेळी या महानगरांत ८ नवीन शॉपिंग सेंटरची निर्मिती होऊन एकूण संख्या २६३ झाली. रिकामी पडलेली शॉपिंग सेंटर नवीन निवासी अथवा व्यावसायिक प्रकल्पासाठी पाडण्यात आली, कायमची बंद करण्यात आली अथवा त्यांचा लिलाव करण्यात आला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.