खासगी विद्यापीठांना राज्यकर्त्यांकडून पायघड्या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पुणे : भारतातील शैक्षणिक बाजारपेठेची दारे परदेशी विद्यापीठांना उघडली असतानाच राज्यातील खासगी विद्यापीठांनाही राज्यकर्त्यांकडून पायघड्या घातल्या जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारती विद्यापीठाने विदर्भातही मोर्चा वळवावा, अशी जाहीर विनंतीच रविवारी केली. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनीही भारतीय विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूटने हिमाचल प्रदेश येथे यावे, असे निमंत्रण दिले.

हेही वाचा >>> शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंस हौसिंग काॅम्प्लेक्सचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या हस्ते रविवारी झाले.

हेही वाचा >>> शरद पवार यांच्यापाठोपाठ रोहित पवारही मैदानात; महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी वर्णी

सीरम इन्स्टि्टयूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी खासगी शिक्षण संस्थांचा शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान असल्याचे सांगत खासगी शिक्षण संस्थांचा गौरव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिक्षण क्षेत्रात ज्याप्रकारे देश पुढे जात आहे ते पहाता एक मोठा बदल येत्या काही दिवसांत पहावयास मिळेल. पुढील पंचवीस वर्षांत शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल होणार आहेत. तंत्रज्ञान ज्या प्रकारे विकसित होत आहे त्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता पुढे जात आहे.

हेही वाचा >>> “मराठी माणसात व्यवसाय करण्याचं धाडस नाही”, चंद्रकांत पाटलांचं पुण्यात विधान; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारती विद्यापीठासारख्या संस्थांनी मिशन म्हणून काम हाती घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. त्यामुळे आता भारती विद्यापीठाने विदर्भातही मोर्चा वळवावा, असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, सुखविंदर सिंग सक्खू यांनीही भारती विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूटला हिमाचल प्रदेशात विस्तार करण्याचे आवाहन केले. त्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.