scorecardresearch

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईताला अटक

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या सराईताला अटक
( संग्रहित छायचित्र )

पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. दत्तनगर येथील गुजर निंबाळकरवाडी याठिकाणी ही कारवाई करण्यात आली. 

रोहित राजू माने (वय २०, रा. दत्तनगर, भारत नगर, गुजर निंबाळकरवाडी) असे अटक करण्य़ात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ आणि खडक पोलीस ठाणे हद्दीतील वाहनचोरीचे चार गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत. उपनिरीक्षक नितीन शिंदे, कर्मचारी मितेश चोरमोले, अवधूत जमदाडे यांच्या पथकाने माने याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून वाहने जप्त करण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Innkeeper stole bike arrested police arrested action pune print news ysh

ताज्या बातम्या