पुणे नगर रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात घुसून नागरिकांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला विमानतळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २७ लाख रुपये किमतीचे ३९ महागडे संच जप्त केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: अनुसूचित जाती घटकांसाठी असलेल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर पुण्यात होणार विचारमंथन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

असद गुलजार महमंद (वय ३२, रा. सोनारवली रोड, दिल्ली), निजाम बाबू कुरेशी (वय ३५, रा. उत्तरप्रदेश), शाहबाझ भोले खान (वय २६, रा. दिल्ली), राहुल लीलिधर कंगाले (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) आणि नदीम इब्राहिम मलिक (वय.३०, रा. यमुना नगर, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>>पुण्यातील दोन गुन्हेगार तडीपार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्समध्ये तीन दिवसीय ‘सुपर सॉनिक लाईव्ह काँसर्ट’ आयोजित करण्यात आली होता. कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ही संधी साधून आरोपींच्या टोळीने कार्यक्रमात अनेकांचे महागडे मोबाईल चोरले. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी विमानतळ पोलिसांत तक्रार देण्यासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमात साध्या वेशातील पोलिसांची संख्या वाढवली. पोलिसांकडून गस्त घातली जात असताना एक जण संशयास्पद दिसून आल्याने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, तो पळून जाऊ लागला. पाठलाग करून असद महमंद याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर मोबाईल चोरणारी टोळी असून इतर साथीदार पुणे रेल्वे स्थानकाजवळील उपाहारगृहामध्ये लपले असल्याचे सांगितले. तेथे धाड टाकून पोलिसांनी उर्वरित आरोपींना अटक केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे , पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, समू चौधरी , अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंड, नाना कर्चे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव अवारी आणि शिवराज चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interstate mobile phone stealing gang jailed pune print news vvk 10 amy
First published on: 27-02-2023 at 21:02 IST