मतांच्या ध्रुवीकरणासाठी जातीयवाद पसरवणारा राज ठाकरे हाच एकमेव माणूस आहे, असा आरोप माजी मंत्री जितेंद्र आव्हाड केला आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कर्तव्य-त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी हा आरोप केला आहे. मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा परिणाम म्हणून काकड आरत्या बंद झाल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा- राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांचा…”

जातीतून इतिहासाकडे पाहण्याचे पेव फुटले असून राजकीय स्वार्थासाठी ठरावीक मूठभर लोक असे करत आहेत. अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यासंदर्भात आव्हाड यांनी ते ज्या पुरंदरे यांचे नाव घेतात त्यांनी खोटा इतिहास सांगितला असा आरोप केला. प्रतापराव गुजर यांची कथा काल्पनिक असल्याचे गजानन मेंहेंदळे यांनी सांगितले असल्याचे इतिहासाचे अभ्यासक जयसिंगराव पवार यांनीच स्पष्ट केले आहे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी भोंगैे बंद करायला गेले. त्याचा फटका ठिकठिकाणच्या काकड आरत्यांना बसला आहे. राज्यपालांसमोर काळे झेंडे दाखविण्याचे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा कायदा आहे. त्यातून सुटका होईलही. पण, महाराष्ट्राच्या बापाचा अपमान होतो तो कसा विसरता येईल, असा सवाल आव्हाड यांनी केला.

हेही वाचा- पुणे: राजभवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वराज्य पक्षाची निदर्शने; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गांधी परिवार, काँग्रेसला त्यागाची मोठी परंपरा आहे. काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची, आपलेपणाची आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि काँग्रेसची हीच विचारधारा आवश्यक आहे. आज द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी भारत जोडो पदयात्रेतून करत आहेत, असे आव्हाड यांनी भाषणात सांगितले.