राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनप्रकरणी पुण्यामधून एका पत्रकाराला अटक करण्यात आलीय. आज दुपारच्या सुमारास या पत्रकाराला अटक करुन मुंबईमध्ये आणण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> पवारांच्या घरावरील हल्ला : विश्वास नांगरे पाटलांना आधीच होती कल्पना; भाजपाने पत्र शेअर करत केला गौप्यस्फोट

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी करण्यात आलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात एका पत्रकाराला पुण्यातून अटक करण्यात आलीय. या व्यक्तीला मुंबईत आणण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत ११५ जणांना अटक करण्यात आली असून एकूण ११५ पैकी १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. एमजेटी मराठी न्यूज हे युट्युब चॅनेल चालविणारा पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
Special court order BJP MP Pragya Singh
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहा, साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष न्यायालयाचे आदेश
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक

याच प्रकरणामध्ये ११ एप्रिल रोजी वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.आहे. आंदोलनाच्या दिवशी सदावर्ते हे नागपूर येथील एकाशी संपर्कात  होत़े  याबाबत पोलीस तपास करत असल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. आता याच प्रकरणात पत्रकाराला अटक झाल्याने या प्रकरणातील बरीच नवीन माहिती समोर येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

काय घडले..
आझाद मैदान येथून शुक्रवारी सकाळपासूनच एक.दोन करून आंदोलनकर्ते बाहेर पडायला सुरुवात झाली. त्यांनी सर्वानी वेगवेगळा प्रवास करून पवार यांचे निवासस्थानाचा परिसर गाठला. त्यावेळी सर्वजण वेगवेगळे होते. त्यानंतर तेथील बागेत एकत्र जमल्यानंतर सर्वानी सिल्व्हर ओकच्या दिशेने येऊन आक्रमक आंदोलन केले. काही आंदोलनकर्त्यांना शरद पवार यांचे घर नेमके कुठले, याचीदेखील माहिती नव्हती. तेथील एका बंद घरापुढेही काही जणांनी आंदोलन केले. याप्रकरणी तपासात आंदोलनापूर्वी पवार यांच्या घराची पाहणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती घेऊन कट रचल्याप्रकरणी हनुमंत वाघमारे, कृष्णांत कोरे, मोहम्मद ताजुद्दीन व गोविंद म्हसरणकर यांना आझाद मैदान येथून ताब्यात घेतले. त्यांना लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.

सदावर्ते यांचे भाषण प्रक्षोभक
सदावर्ते यांनी ७ एप्रिलला भाषण केले होते. ते प्रक्षोभक असल्याचा आरोप पोलिसांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. या भाषणात मंत्री अनिल परब, संजय राऊत, नवाब मलिक व शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तसेच बारामती येथील पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचेही ते बोलले होते, असे विशेष सरकारी वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले.