लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: वाकड परिसरातील बंद दुकाने, मॉलवर रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री थेरगाव येथे करण्यात आली. आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
mumbai, Former BJP Corporator, Cancellation, Government's Free Membership Nominations, write letter, cm, mahalxmi race course, Willingdon Club, Royal Western India Turf Club, Prestigious club,
महालक्ष्मी रेसकोर्स आणि विलिंग्डन क्लबसाठी ५० आजीव सदस्य नामनिर्देशित करण्याचा निर्णय रद्द करा
suicide
कात्रज तलावात तरुणीची उडी मारून आत्महत्या, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

शाम हरी गाडवे (वय २१, रा. आकुर्डी), अतिश भारत सिरसाट (वय १९, रा. लिंकरोड, चिंचवड), नवनाथ दिंगबर साठे (वय ३५, रा. थेरगाव) आणि करण उर्फ कल्ला टाक (रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, शुभम सिद्राम कांबळे (वय १९, रा. भाटनगर, पिंपरी) हा पसार झाला.

हेही वाचा… सावकाराच्या जाचाला कंटाळून पुण्यात एकाची आत्महत्या

आरोपी थेरगाव परिसरात संशयितरित्या थांबल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना चापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. एक जण पळून गेला. आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पावडर, तीनचाकी टेम्पो, दुचाकी जप्त करण्यात आली. वाकड परिसरातील बंद दुकाने, मॉल हे सुरक्षारक्षकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.