पुणे : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. मनोज जरांजे पाटील यांनी दिलेली मुदत संपली आहे. विधीमंडळाचे अधिवेशनही संपले आहे. अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत काय चर्चा झाली असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले, की की मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील संवाद उत्तम सुरू आहे.

हेही वाचा >>> खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचे शरद पवार यांच्यावर भाष्य.. म्हणाले, ‘तो नैसर्गिक गुण पवारांमध्येही…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरांगे यांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या पूर्ण होत चालल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून जरांगे यांच्या उपोषणाची सुरुवात झाली. स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र, मग कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र आणि आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र अशा त्यांच्या मागण्यांचा प्रवास राहिला आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळत नाही असे त्यांचे जे मत आहे, त्याबाबत त्यांचे आता बरेच समाधान झाले आहे, असे माझे मत आहे. आतापर्यंत काही लाख नोंदी सापडल्या आहेत. पण या नोंदी काही लपवून ठेवलेल्या नव्हत्या. साधारणपणे वैयक्तिक मागणी केल्यावर असे प्रमाणपत्र मिळते, पण समाज म्हणून प्रमाणपत्र मिळण्याची मागणी झाल्यावर सरकारने समिती नेमली. त्यामुळे आता काही कोटी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. म्हणून जरांगे पाटील समाधानी आहेत, असे पाटील म्हणाले.