पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दुचाकी अथवा मोटारींसाठी नवीन क्रमांकांची मालिका सुरू करण्याआधी त्यातील आकर्षक क्रमांकाचा लिलाव केला जातो. त्यात आपल्या गाडीला आवडीचा क्रमांक मिळविण्यासाठी अनेकजण लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत. मागील वर्षभरात आरटीओने या लिलावातून ४७ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळविला आहे. विशेष म्हणजे, एका व्यक्तीने १ क्रमांकासाठी तब्बल १२ लाख रुपये मोजले आहेत.

दुचाकी अथवा मोटारींसाठी नवीन क्रमांकांची मालिका सुरू करण्याआधी त्यातील आकर्षक क्रमांकाचा लिलाव आरटीओकडून होतो. मोटारींसाठीच्या नवीन क्रमांकांची मालिका असल्यास क्रमांकानुसार १५ हजार रुपये ते ४ लाख रुपये शुल्क असते. हे शुल्क भरल्यानंतर लिलाव होतो आणि त्यात जास्त बोली लावणाऱ्यास तो क्रमांक दिला जातो. दुचाकीसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरू होत असल्यास मोटारींसाठी त्यातील आकर्षक क्रमांकाचा तिप्पट शुल्क आकारून लिलाव केला जातो. आकर्षक क्रमांकासाठी तिप्पट शुल्क आणि लिलावातील बोली अशी एकूण रक्कम द्यावी लागते.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
megha engineering
निवडणूक रोखे खरेदीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मेघा इंजिनिअरिंग कंपनी CBI च्या रडारवर! गुन्हा दाखल
number of Pune residents spending lakhs of rupees to get attractive number for vehicle has increased
आकर्षक क्रमांकासाठी पुणेकरांचा होऊ दे लाखोंचा खर्च! जाणून घ्या सर्वांत महागडे क्रमांक…

आकर्षक क्रमांकाच्या लिलावातून आरटीओला मिळणाऱ्या महसुलात मागील वर्षी सुमारे ५० टक्के वाढ नोंदविण्यात आली. आकर्षक क्रमांक घेणाऱ्या वाहनांची संख्या २०२२ मध्ये ४० हजार १०३ होती. ही संख्या २०२३ मध्ये ५० हजार ९४१ झाली.

-संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

आकर्षक क्रमांकातून मिळालेला महसूल

वर्ष – रक्कम (कोटी रुपयांत)

२०२२ – ३३ कोटी ५० लाख ५७ हजार ८५१

२०२३ – ४७ कोटी १४ लाख ९६ हजार ८०७

आरटीओने २०२३ मध्ये आकर्षक क्रमांकाच्या लिलावातून ४७ कोटी १४ लाख ९६ हजार ८०७ रुपयांचा महसूल मिळविला. आरटीओला त्यातील ४५ कोटी ५३ लाख ९१ हजार रुपये लिलाव शुल्कापोटी मिळाले आहेत. उरलेले ३ कोटी ६१ लाख ५ हजार ८०७ रुपये प्रत्यक्ष लिलावाच्या बोलीतून मिळाले आहेत. मागील वर्षी १ क्रमांकासाठी सर्वाधिक बोली लावण्यात आली. हा क्रमांक मोटारींच्या ऐवजी इतर वाहनांच्या नवीन क्रमांकाच्या मालिकेतून घेण्यात आला. त्यासाठी १२ लाख रुपये मोजण्यात आले, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.