दुचाकीवरून घरी जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे. शनिवारी रात्री आंबेगाव तालुक्यातील चांदोली परिसरात ही घटना घडली. छाया आत्मराम राठोड असं या महिलेचं नाव असून ती गरोदर असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळेच कोंडी सुटेल, पुण्यातील कोंडीबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजित गाडगीळ यांचे मत

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, छाया राठोड आणि त्यांचे पती उसतोडणी कामगार आहे. शनिवारी दोघेही उस तोडणीसाठी मंचर येथे गेले होते. मात्र, रात्री मंचरहून घरी परतताना पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या आंबेगाव तालुक्‍यातील चांदोली परिसरात बिबट्याने उसाच्या शेतातून उडी मारत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात छाया राठोड यांच्या हातापायला दुखापत झाली. तसेच त्यांच्या पतीलाही थोडा मार लागला. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ राठोड यांना रुग्णालयात दाखल केले.

छाया राठोड यांची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती मंचरच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर स्मिता राजहंस यांनी दिली. तसेच आम्ही या भागात बिबट्याच्या वाढत्या हल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कामगारांना आवश्यक सुचना दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. याबरोबरच या परिसरात आम्ही गस्त वाढली असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – पिंपरी : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर गौतमी पाटीलबाबत म्हणाल्या….अंगभर कपडे घालून लावणीचे सादरीकरण कर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या आंबेगाव तालुक्‍यातील चांदोली परिसरात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रवारी महिन्यातही बिबट्याने दुचाकीस्वार दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. दैव बलवत्तर हाेते दुचाकीस्वार दाम्पत्य बचावले होते.