पुणे : पुणे , पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात स्वातंत्र्यदिनाला हलक्या पावसाने हजेरी लावली. ध्वजारोहणाला सकाळच्या वेळेत मात्र पावसाने उघडी दिली होती. त्यामुळे शहरातील कार्यक्रम पावसाच्या अडथळ्याविना उत्साहात पार पडले. दुपारनंतर मात्र शहरात पावसाला सुरुवात झाली. घाट विभागात पावसाचा जोर मोठा होता. शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार शहर आणि परिसरात मंगळवारीही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे सध्या दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे. पुणे शहर आणि परिसरातही पाऊस होतो आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिनाला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार बहुतांश भागात सोमवारी सकाळपासून पावसाची हजेरी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सकाळच्या वेळी मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे शहरात सर्वच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. पुणे शहरामध्ये दुपारी काही भागात पावसाच्या जोरदार सारी कोसळल्या. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सकाळपासूनच हलक्या स्वरूपाचा पाऊस होता. जिल्ह्यातील घाट विभागांमध्ये पावसाचा जोर मोठा होता. मावळ, मुळशी या तालुक्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. पुणे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रामध्येही सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमधील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे.