लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पिंपरी – चिंचवडकर साहित्यिकांनी देहूरोड येथील मुंबई पुणे रस्त्यावरील कमानीपासून आकुर्डीपर्यंत आयोजित केलेल्या दिंडीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. प्रकाश घोरपडे (संत तुकाराम), सुभाष चव्हाण (संत नामदेव), सुरेश कंक (वासुदेव) आणि संगीता जोगदंड (संत जनाबाई) यांनी वेषभूषा परिधान करून हातात वीणा, टाळ – चिपळ्या आणि डोक्यावर तुळस घेऊन अभंग, भक्तिगीते गात केलेली वाटचाल भाविकांना भावली. अनेक भाविकांनी चरणस्पर्श करीत नमस्कार केला; तर तरुणाईने आवर्जून त्यांच्याबरोबर सेल्फी काढली.

ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. पी. एस. आगरवाल, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, सुहास घुमरे, सविता इंगळे, अण्णा जोगदंड, कैलास भैरट, फुलवती जगताप, शामराव सरकाळे, शिवाजी शिर्के, सुभाष चटणे, दत्तात्रय कांगळे, योगिता कोठेकर, आत्माराम हारे, रघुनाथ पाटील, रेखा कुलकर्णी, हेमंत जोशी, भाऊसाहेब गायकवाड, सुरेश कोंडे, जयश्री घावटे, संजय गमे, अंबादास रोडे, बाळकृष्ण अमृतकर, प्रकाश ननावरे, अनंत पाठक, मुकुंद जोशी, अशोक वानखेडे, प्रकाश रणदिवे, देवेश रणदिवे, जयविजय जगताप आदी साहित्यिक पारंपरिक वेषभूषा परिधान करून संतवचने, पर्यावरण संवर्धनाची घोषवाक्ये आणि स्वरचित भक्तिगीतांच्या ओळींचे फलक घेऊन ‘ज्ञानोबा माउली – तुकाराम’ , ‘जय जय रामकृष्ण हरी’ असा जयघोष करीत दिंडीत सहभागी झाले होते.

आणखी वाचा-आळंदी : “नियोजनाच्या नावाखाली मंदिरात…”, वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्यावरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

रस्त्याच्या कडेला असलेल्या एका डेरेदार वृक्षाच्या छायेत राजेंद्र घावटे यांनी केलेल्या कविसंमेलनाच्या बहारदार सूत्रसंचालनाखाली सुमारे वीस कवींनी आपल्या आध्यात्मिक रचनांनी भक्तिरसाचा परिपोष करीत भाविकांना सुमारे एक तास खिळवून ठेवले. सरोजा एकोंडे, वंदना गायकवाड, दीपाली गोरे, मनीषा उगले, माधवी अवचट, देविका अवचट, योगिता रोडे, पूनम रणदिवे, सविता अवचट, मनाली पाठक, माधवी अवचट यांनी डोईवर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग घेतला. तसेच सहभागी झालेल्यांनी फुगड्या खेळून वारीचा आनंद घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशोक गोरे, तानाजी एकोंडे, एकनाथ उगले, मुरलीधर दळवी, शरद काणेकर, अरविंद वाडकर, अण्णा गुरव, मल्लिकार्जुन इंगळे, शामराव गायकवाड, कैलास अवचट, शामराव साळुंखे यांनी संयोजन केले.