पुणे : पंतप्रधान मोदींनी भारताला पुढे नेले आहे. सन २०२४ ते २९ हा भारतासाठी निर्णायक काळ असणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर ‘भारता’साठी महत्त्वाची आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.

हेही वाचा >>> “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..”, धीरेंद्र शास्त्रींनी केला उल्लेख आणि म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे बैठक घेतली. भाजप पदाधिकाऱ्यांना त्यांनी संबोधित केले. तसेच पुणे दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की ही निवडणूक भाजपसाठी नाही, तर भारतासाठी महत्त्वाची आहे. कारण ज्या प्रकारे मोदीजींनी भारताला पुढे नेले आहे. त्यामुळे २०२४ ते २०२९ हा काळ भारतासाठी निर्णायक असणार आहे. यासाठी सर्वांनी ध्येय समोर ठेवून काम करावे. सर्व मतदारसंघ आणि बूथवर तयारी केली जाणार आहे. मित्रपक्ष लढतील, त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे.  त्यामुळे ध्येय ठेवून काम करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या आहेत.

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांपुढे लीन, म्हणाले; “धीरेंद्र शास्त्रींनी सनातन धर्माविषयी जनजागृती..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत विश्वचषक हरला कारण तेथे नरेंद्र मोदी आले होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, की सामान्य माणसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘गरिबों के मसीहा’ आहेत. भ्रष्टाचारी लोक त्यांना घाबरून आहेत. राहुल गांधींना त्यांचा पक्ष आणि नागरिकही गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांना का महत्त्व देऊ?