पुणे : पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलकडे पाहिले जात आहे. इथेनॉलबाबत जगभरात वेगवेगळे प्रयोगही सुरू आहेत. त्यामुळे इथेनॉल या विषयावर समग्र चर्चा होण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे उद्या (२६ डिसेंबर) पुण्यात ‘लोकसत्ता इथेनॉल परिषद २०२२’ आयोजित करण्यात आली आहे. इथेनॉलच्या वापराला चालना देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात उसाच्या रसापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण सर्वाधिक आहे. इथेनॉल निर्मिती क्षमताही सातत्याने वाढत आहे. त्याबरोबरच कुजलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाल्यासह अन्य कृषी अवशेषांपासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. देशातील इथेनॉल निर्मितीचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेषत्वाने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक खिडकी योजनासारखे उपक्रमही राबवले जात आहेत. साखर कारखानदारीत आघाडीवर असलेले महाराष्ट्र इथेनॉल निर्मितीतही आघाडीवर आहे. येत्या काळात इथेनॉल उद्योगाचे भविष्य, या उद्योगापुढे असणाऱ्या अडचणी, नव्या संधी, या बाबत चर्चा करण्यासाठी इथेनॉल परिषद होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह कायनेटिक उद्योग समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ethanol council union road transport minister nitin gadkari amy
First published on: 25-12-2022 at 02:54 IST