पिंपरी- चिंचवड: लोणावळ्यात पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं. पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. लोणावळ्यात अवघ्या २४ तासात तब्बल ४३२ मी.मी म्हणजे १७ इंच सेंट पाऊस कोसळला आहे. असाच सतत पाऊस कोसळत राहिल्यास लोणावळ्यातील गेल्या वर्षीच्या विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

पर्यटननगरी लोणावळ्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. शहरात मुसळधार पाऊस कोसळला आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत. अनेक सखल भागात पाणी साचलं होत. पर्यटकांना देखील यामुळं काही प्रमाणात ब्रेक लागला होता. लोणावळ्यात गेल्या २४ तासात तब्बल ४३२ मिलीमीटर म्हणजे १७ इंच सेंट पाऊल कोसळला आहे. अक्षरशः लोणावळ्यातील नागरिकांना पावसाने झोडपून काढलं आहे. गेल्या वर्षी आत्तापर्यंत ४ हजार ५१४ मिलीमीटर पाऊस झाला होता. तो यावर्षी वाढला आहे. यावर्षी आत्तापर्यंत तब्बप ४ हजार ८१० मिलीमीटर इतका पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी कालच्या दिवशी केवळ पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. पुढे ही परतीचा पाऊस अशाच पद्धतीने कोसळला तर गेल्या वर्षीचा पावसाचा विक्रम नक्की मोडला जाऊ शकतो.