पुणे : विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा : Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

हेही वाचा : गणेशभक्तांचे आकर्षण असणाऱ्या पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; मानाच्या गणपती विसर्जनाला विलंब

वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ प्रथेप्रमाणे शुक्रवारी (९ सप्टेंबर) मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून झाला. गुरुवारी (८ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता केळकर रस्ता परिसरात मंडळांनी विसर्जन सोहळ्यासाठी तयार केलेले देखाव्यांचे रथ लावले होते. मध्यरात्रीनंतर सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेतील छोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. बांबुचे अडथळे उभे करण्यात आले. विसर्जन मार्गावरुन मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनीवर्धकांच्या दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी ध्वनिवर्धकासह प्रखर प्रकाशझोत सोडले होते. ध्वनिवर्धकांच्या भिंतीसमोर तरुणाई नाचत असल्याचे पाहायला मिळाले. बाजीराव रस्तामार्गे कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाने उच्च क्षमेतेचे ध्वनिवर्धकांचा वापर केला होता.

हेही वाचा : घरगुती गणपतींचे विसर्जन दादर, माहीम चौपाटीवर अधिक; गणेशभक्तांची विसर्जनासाठी गर्दी कायम

ध्वनिवर्धकांचा दणदणाटामुळे विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहणाऱ्या भाविकांना त्रास झाला. ढोल ताशा पथकांचा आवाजाने मर्यादा ओलांडली होती. भाविकांसह स्थानिक रहिवाशांना आवाजाचा त्रास झाला. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरात सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. आकर्षक देखावे प्रकाश योजनेमुळे लक्षवेधी ‌ठरले होते.

दणदणाटामुळे पोलीसही हतबल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेले दोन वर्ष करोना संसर्गामुळे विसर्जन मिरवणूक निघाली नव्हती. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने विसर्जन मार्गावरील बहुतांश मंडळांनी उच्चक्षमेतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरली होती.  ‌ढोल ताशा पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने पोलीसही हतबल झाले. विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळनंतर झालेल्या गर्दीमुळे विसर्जन मार्गावरुन चालणे देखील अवघड झाले होते.