scorecardresearch

पिंपरी : बंडखोरीचा फटका बसला, पराभव मान्य – नाना काटे

विजयासाठी सत्ताधा-यांनी पैशांचा पाऊस पाडला. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करणार आहे.

पिंपरी : बंडखोरीचा फटका बसला, पराभव मान्य – नाना काटे

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाली नसती. तर विजय आमचाच होता. बंडखोरीचा फटका बसला. शेवटच्या दोन दिवसात भाजपने पैशांचा भडीमार केला. त्यामुळेच आपला पराभव झाला असून हा पराभव मान्य आहे. यापुढे अधिक जोमाने करु अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांनी पराभवानंतर दिली.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड निवडणुकीवर अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “गड आला पण…”

अटीतटीच्या लढतीत पराभव झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना नाना काटे म्हणाले, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. पण, पराभव झाला. हा पराभव मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो नाही. मतदार आमच्यासोबत होते. शेवटच्या दोन दिवशी भाजपने पोलीस बंदोबस्तात पैसे वाटले. अतिशय जास्त प्रमाणात पैशांचे वाटप झाले. भाजपला सहानुभूती नव्हती. सहानुभूती असती तर भाजपने पैसे वाटसे नसते. विजयासाठी सत्ताधा-यांनी पैशांचा पाऊस पाडला. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 18:20 IST
ताज्या बातम्या