पुणे : दिवाळीप्रमाणेच गुढी पाडव्याला राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांमधून आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली. मात्र, सरकारने यासाठीच्या निविदा दोनच दिवसांपूर्वी निश्चित केल्यामुळे हा शिधा जिल्ह्यात किरकोळ स्वरुपात प्राप्त झाला आहे. तो पाडव्यापर्यंत गरजू नागरिकांच्या घरात पोहोचणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नऊ महिन्यांपासून धान्याचे सेवामूल्य (कमिशन) मिळाले नसतानाही हा शिधा ताब्यात घेण्यापूर्वी त्याची रक्कम जमा करावी, असा आग्रह अन्नधान्य पुरवठा विभागाकडून धरला जात आहे. त्यामुळे हा शिधा वेळेत मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> पुणे : वाहतूक सेवा पुरविल्याचे २०० कोटी रुपये पीएमपीला द्या; मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यात अंत्योदय व प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना १०० रुपयांत एक लिटर तेल, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर मिळणार आहे. दिवाळीलादेखील असा शिधा वाटण्यात आला होता. त्यासाठी एकाच खासगी यंत्रणेला पुरवठ्याचे काम देण्यात आल होते. त्यामुळे राज्यभर हा शिधा पोचण्यात अडचणी आल्या होत्या. आता मात्र, राज्य सरकारने जास्तीच्या यंत्रणा नेमल्या आहेत. मात्र, त्याच्या निविदा दोन दिवसांपूर्वीच अंतिम करण्यात आल्याने हा शिधा मिळण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. बुधवारी (२२ मार्च) गुढीपाडवा असून त्यापूर्वी हा शिधा दुकानांमध्ये पोहोचणे अवघड झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी खेड तालुक्यात केवळ दोन गाड्या शिधा मिळाला. सोमवारनंतर ही आवक वाढेल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी सांगितले.

जिल्ह्यात शिधा लाभार्थ्यांची संख्या पाच लाख ६१ हजार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात तीन लाख १७ हजार लाभार्थी जिल्ह्यात १८२३, शहरात ६९९ स्वस्त धान्य दुकाने