IMD Maharashtra Monsoon Update यंदा लवकर केरळात दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी वेगाने प्रवास केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमी वारे आता पुणे, मुंबईसह राज्याचा काही भाग व्यापला आहे. यंदाच्या मे महिन्यात वातावरणात बदल झाले. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपेक्षा ढगाळ हवामान, पावसाचे प्रमाण जास्त राहिले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बसरल्या आहेत. बारामती, इंदापूरसारख्या काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रात प्रगती केली आहे. तसेच कर्नाटकातील बंगळुरू, तामिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बंगालच्या उपसागरातील उत्तर भाग, ईशान्य भारतातील राज्यांचा भाग व्यापला आहे. तसेच 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील पुणे, मुंबईपर्यंत मजल मारली आहे. मोसमी वाऱ्यांची उत्तरसीमा मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, महाबूूनगर, आगरतळा, गोलपारापर्यंत आहे.मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीच्या दृष्टीने पूरक परिस्थिती असून, अरबी समुद्रातील उर्वरित भाग, महाराष्ट्राचा आणि काही भाग, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ईशान्य भारत, पश्चिम बंगालमध्ये पुढील तीन दिवसांत मोसमी वारे पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.