पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार १० डिसेंबरऐवजी ही परीक्षा आता १७ डिसेंबरला होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यात आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. परीक्षा परिषदेने ही परीक्षा १० डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव या परीक्षेच्या नियोजनात बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा १७ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.