आज विरोधी पक्षात आहे. उद्या जनतेने सत्तेत बसण्याची संधी दिली, तर मंत्री तर होईनच. मात्र, पुण्याचा पालकमंत्री म्हणून ‘पुन्हा येईन’ अशी टिप्पणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात केली. त्यानंतर काही वेळातच याबाबत पत्रकारांशी विचारल्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अजितदादा पुन्हा पालकमंत्री म्हणून परततील, पण कोणत्या पक्षाकडून?,’ अशा शब्दांत पवारांची खिल्ली उडवली.

हेही वाचा >>> पुणे: ‘महाराष्ट्राची एक इंचही जागा जाता कामा नये’; अजित पवार यांचे वक्तव्य

Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी अजित पवार आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘आज आम्ही विरोधी पक्षात आहोत. उद्या जनतेने सत्तेत बसण्याची संधी दिली, तर मंत्री तर होईनच. मात्र, पुण्याचा पालकमंत्री म्हणून ‘पुन्हा येईन.’ याबाबत पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अजितदादा पुन्हा सत्तेत येतील. पालकमंत्री म्हणूनही परततील. मात्र, कोणत्या पक्षाकडून हे त्यांनी सांगतिले का?’

शिंदे दर्शनाला चालले, की बळी द्यायला?

राज्यपालांच्या भूमिकेविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा दिलेल्या इशाऱ्याकडे सकारात्मकतेने पाहतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये होते, तेथील हॉटेलचे देयक न दिल्याने हॉटेल मालकाने आत्महत्या केली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे दर्शनाला चालले, की बळी द्यायला चालले, ते त्यांनाच माहीत, अशी टीका त्यांनी केली.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबत पवार म्हणाले, ‘तपासात कुचराई झाली असेल, तर जलदगती न्यायालयात हा खटला चालविला पाहिजे. सोन्यासारख्या मुलीचे ३५ तुकडे करणाऱ्या नराधमाला तातडीची फाशी दिली, तर चुकीचे ठरणार नाही.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कडक उत्तर द्यावे

राज्य सरकारने जत, पंढरपूरकडे लक्ष देऊन स्थानिकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. तेथील नागरिकांना आपलेपणाची वागणूक मिळेल, असे सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांनी लक्ष दिले पाहिजे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या सीमावादावरील विधानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कडक भाषेत उत्तर दिले पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले.