थकीत वीज देयक वसुलीसाठी गेलेल्या महाविरणमधील अधिकारी; तसेच कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना खडकी भागात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अबू सईद मोहम्मद कुरेशी (वय ४२, रा. जुना बाजार, खडकी) याच्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणमधील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी विवेक काळे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>लोणावळ्यात बंगल्यातील जलतरण तलावात बुडून बालिकेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळे आणि सहकारी कर्मचारी निलेश कदम थकीत वीज देयक वसुलीसाठी कुरेशी यांच्याकडे गेले होते. त्यांचे सहा हजार रुपये देयक थकीत होते. वीज देयकाबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर कुरेशी यांनी काळे आणि कदम यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण केली.शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अनिल रिकिबे तपास करत आहेत.