मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत. द्रुतगती मार्गावरील पळस्पा हद्दीतील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात घडला. यामध्ये दिपक दत्तात्रय बोराटे (४५) व मंदाकिनी दिपक बोराटे (५०) या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर, राहुल बोराटे, गंगुताई चिरमे व प्रगती चिरमे हे तिघेजण जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर सध्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण पुण्यातील गोखले नगर येथील रहिवासी आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jan 2016 रोजी प्रकाशित
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कार आणि ट्रकची धडक; दोघांचा मृत्यू
हे सर्वजण पुण्यातील गोखले नगर येथील रहिवासी आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 27-01-2016 at 07:52 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major accident on mumbai pune express way