महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या औरंगाबाद केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. परीक्षेदरम्यान एक उमेदवार ब्लूटूथचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित उमेदवारावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमपीएससीने ट्विटद्वारे ही माहिती दिली. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२च्या औरंगाबाद येथील केंद्रावर परीक्षेच्यावेळी ब्लूटूथच जवळ बाळगल्याबद्दल सचिन नवनाथ बागलाने या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एमपीएससीने ट्विटमध्ये नमूद केले. एमपीएससीकडून रविवारी राज्यातील सहा केंद्रांवर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ घेण्यात आली.

हेही वाचा – पुणे : वानवडीतून अपहरण झालेल्या उच्चशिक्षित तरुणाची तळेगाव दाभाडे परिसरातून सुटका; चौघे गजाआड

हेही वाचा – “आम्ही आकडे वाढविण्यासाठी करार केलेले नाहीत”, एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांकडून तंत्रज्ञानाचा वापर करून गैरप्रकार होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वारंवार निदर्शनास आले आहेत. अशा प्रकरणात एमपीएससीकडून फौजदारी कारवाईसह संबंधित उमेदवारांना प्रतिरोधितही करण्यात आले आहे.