लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शाहूनगर, चिंचवड येथील राजर्षी शाहू उद्यानाचा पुनर्विकास करताना महापालिकेने एक कोटी ६६ लाखांचा खर्च केला आहे. निविदेतील अटी-शर्तीनुसार उद्यानाचे काम झाले नाही. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. या कामात एक कोटी २० लाख रुपयांचा गैरव्यहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला. याप्रकरणी ठेकेदार, सल्लागारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Mahavitaran Employee, Fatally Attacked, High Electricity Bill, Inquiry, murder in pune, murder in baramati, Mahavitaran Employee attacked, Mahavitaran Employee murder, barmati news, marathi news, pune news, mahavitaran news, police,
बारामती : महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा कोयत्याने १६ वार करून खून, विजेचे बिल जास्त आल्याने ग्राहकाकडून हल्ला
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
ग्रामविकासाची कहाणी

खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या वास्तुविशारदाला महापालिकेने सल्लागार पॅनलवर घेतले. या वास्तुविशारदाने नातेवाईक असलेल्या ठेकेदाराशी संगनमत करून उद्यानाच्या पुनर्विकासाचे कंत्राट मिळविले. काम करताना निविदेतील अटी-शर्तीनुसार साहित्य वापरले गेले नाही. हलक्या दर्जाचे, निकृष्ट साहित्य वापरून काम पूर्ण केले. देयक मात्र निविदेतील अटी-शर्तीनुसार देण्यात आले आहे. एक कोटी ६६ लाख रुपयांचे देयक ठेकेदाराला दिले आहे. यात ठेकेदाराने एक कोटी २० लाख रुपयांची लूट केल्याचा आरोप भापकर यांनी केला.

आणखी वाचा- आढळरावांविरोधात वीस वर्षे टोकाचा संघर्ष करणाऱ्यांचे मनोमिलन कसे होणार? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

याबाबत आयुक्तांकडे दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी तक्रार केली होती. परंतु, यावर अद्यापही कारवाई केली नाही. आयुक्तांनी उद्यानात झालेल्या कामाच्या दर्जाची पाहणी करावी. संबंधित वास्तुविशारद, स्थापत्य, उद्यान, विद्युत, लेखापरीक्षक व निविदा प्रक्रियेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. ठेकेदाराचे देयक दिले आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर उपअभियंत्याकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सह शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.