शुक्रवार पेठेतील खडकमाळ परिसरातील मामलेदार कचेरीच्या जागेला पेशवे आणि ब्रिटिशकालीन इतिहास आहे. पेशव्यांचा तोफखाना या कचेरीच्या जागेत होता. तर, ब्रिटिशांनी या जागेत कारागृह आणि न्यायालय स्थापन केले होते. तहसीलदारांना पूर्वी मामलेदार म्हटले जायचे आणि ते येथे बसून शहराचे कामकाज पाहत असत. त्यामुळे या जागेला मामलेदार कचेरी असे नाव पडले. मामलेदार कचेरी सुमारे चार एकर जागेत आहे. पूर्वी शहरातील नागरिकांचे सर्व उत्पन्नाचे दाखले या कचेरीत मिळत असत.

सद्य:स्थितीत मामलेदार कचेरीत पुणे शहराचे तहसीलदार यांचे प्रमुख कार्यालय असून या बरोबरच नगर भूमापन अधिकारी, वन विभाग, दुय्यम निबंधक अशी विविध कार्यालये येथे आहेत. तसेच आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे स्मारक देखील कचेरीच्या जागेत आहे. सातबारा उतारे, फेरफार दाखले देखील या कचेरीतून दिले जातात.

gadchiroli lok sabha , sironcha polling station, evm technical glitch, new evm machine, aheri, helicopter, lok sabha 2024, election 2024, polling station, polling day, gadchiroli news, gadchiroli polling news,
ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…
nagpur, Technical Fault, evm machine, Delays Polling by 1 Hour, jai mata school, dighori polling station, polling day, lok sabha 2024, election 2024, election news, polling news, ngpur news, marathi news,
नागपूर : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,’येथे’ मतदानाला एक तास उशिरा सुरुवात
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
mumbai, J J Hospital, ART Center, HIV AIDS Treatment, Celebrate 20 Years, 43 thousand, Patients Treated,
जे. जे. रुग्णालयात ४३ हजार एचआयव्ही रुग्णांवर उपचार, पहिल्या एआरटी केंद्राला २० वर्षे पूर्ण

ब्रिटिश काळात या जागेत न्यायालय होते. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांना येथील न्यायालयात जेम्स टेलर या न्यायाधीशाने फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्या आवारातच फाशीची अंमलबजावणी देखील केली गेली. सद्य:स्थितीत कचेरीच्या जागेत आतमध्ये उमाजी नाईक यांचे स्मारक करण्यात आले आहे. नागरी सुविधा केंद्र शहराच्या विविध भागात सुरू होण्याआधी मामलेदार कचेरीतूनच विविध उत्पन्नाचे दाखले दिले जायचे. नागरी सुविधा केंद्रे सुरू झाल्यानंतर कचेरीतील कामकाजाचे विकेंद्रीकरण झाले.

पेशवेकाळात कचेरीच्या जागेत पेशव्यांचा तोफखाना होता. ब्रिटिशांचा अंमल लागू झाल्यानंतर शहरातील मध्यवर्ती जागा असल्याने तेथे कारागृह देखील उभारले  होते.  याच काळात न्यायालय स्थापन करण्यात आले होते.  या जागेला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले ते उमाजी नाईक यांच्यामुळे. उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा पुकारला होता. त्यांना ब्रिटिशांनी पकडून कचेरीच्या जागेतील तत्कालीन न्यायालयात हजर केले. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली व न्यायालयाच्या जागेतच फाशीची अंमलबजावणी करण्यात आली. उमाजी नाईक यांच्याप्रमाणेच इतर क्रांतिकारक किंवा नागरिकांनी धाडस करू नये म्हणून त्यांचा देह झाडावर तीन दिवस लटकवून ठेवण्यात आला होता. उमाजी नाईक यांचे स्मरण म्हणून जागोजागी फलक उभारण्यात आले आहेत. फाशी दिलेल्या ठिकाणचे तत्कालीन न्यायालयाचे ठिकाण, फाशीची अंमलबजावणी केलेले ठिकाण येथे माहितीपर फलक लावण्यात आले आहेत. तसेच नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध काढलेला जाहीरनामा आणि त्यांचे घोडय़ावर स्वार असलेले चित्र देखील लावण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी सुविधा केंद्र सुरू झाल्यानंतर मामलेदार कचेरीतील कामांचे विकेंद्रीकरण करण्यात आले. सद्य:स्थितीत मामलेदार कचेरीच्या जागेत पुणे शहराचे तहसीलदार कार्यालय असून उत्पन्न, तात्पुरता रहिवास, ज्येष्ठ नागरिक आणि ऐपत प्रमाणपत्र असे विविध दाखले दिले जातात. याबरोबरच नगर भूमापन अधिकारी क्र. दोन कार्यालय, शहराचे संजय गांधी योजना, वनविभाग, मंडल अधिकारी येरवडा, मुंढवा, बोपोडी व औंध यांचे तलाठी कार्यालय, भूमी अभिलेख खाते, हवेली दुय्यम निबंधक अशी विविध कार्यालये कार्यरत आहेत.

शहराचा मध्यवर्ती भाग आणि शासकीय कार्यालयांची संख्या अधिक असल्याने मामलेदार कचेरीत दररोजच नागरिकांची ये-जा असते. हा परिसर नेहमीच नागरिकांच्या गर्दीने फुललेला असतो.

वकील, पक्षकार, सामान्य नागरिक कामाच्या निमित्ताने तर, ऐतिहासिक जागा असल्याने अनेक नागरिक दररोज मामलेदार कचेरीला भेट देतात.

प्रथमेश गोडबोले – prathamesh.godbole@expressindia.com