बहिणी सोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून भावाने प्रियकराची हत्या केल्याची घटना देहूरोडमध्ये घडली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. अजय जोगिंदर लुक्कड असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. या घटने प्रकरणी कुणाल चंदू सकट, प्रेम सचिन मोरे आणि ओमकार उर्फ गणेश रवींद्र पवार अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>> सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागिर पसार; रविवार पेठेतील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरू महामार्गलगत असलेल्या देहूरोड परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी खदानीमध्ये अजय चा आज मृतदेह आढळून आला. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अजयची हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर अजयचे आरोपी कुणाल चंदू सकट या तरुणाच्या बहिणीशी प्रेम संबंध असल्याचे समोर आलं. बहिणी सोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या रागातून भाऊ कुणाल सकट याने इतर दोघांच्या मदतीने अजयला डोंगराच्या पायथ्याशी बोलवून खदानित ढकलून देऊन जीवे ठार मारल्याचं समोर आलेल आहे.  याप्रकरणी तिघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतल असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.