पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ग्वाही; कार्यकर्त्यांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन
पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या उज्ज्वल परंपरेला सव्वाशे वष्रे पूर्ण होत आहेत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सवाला सुरुवात केली होती, तो उद्देश यंदाच्या गणेशोत्सवात आपण सार्थ करू. गणेशोत्सवाची ही परंपरा जगभर पोहोचायला हवी यासाठी कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन केले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी उत्सव निर्वघ्नि पार पाडण्यासाठी मंडळे आणि पोलीस खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे काम करुया, अशी ग्वाही दिली.
अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे शुक्ला यांच्या हस्ते गुरुवर्य जगोबादादा वस्ताद तालमीचे अध्यक्ष ईमाम मोईद्दीन खान यांना लोकमान्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ट्रस्टचे विश्वस्त शांतिलाल सुरतवाला, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. सुधीर हिरेमठ, सी. एच. वाकडे, विनायक घाटे, अशोक जाधव, शिरीष मोहिते या वेळी उपस्थित होते. युवा वाद्य पथकाला लोकमान्य गणेश सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आझाद हिंद मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल पायगुडे, श्री काळभरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष उमेश सपकाळ, श्रीकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष विशाल ओव्हाळ, अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन धनकुडे, आदर्श तरुण मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष डॅनियल लांडगे यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. राठी ब्रदर्स फेटेवालेचे निशिकांत राठी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
बापट म्हणाले, गणेशोत्सव मंडळे धार्मिकतेतून सामाजिकतेकडे वळत आहेत. परदेशातील लोक उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. आपला उत्सव ज्याप्रमाणे होतो. त्याप्रमाणे मंडळे आणि कार्यकत्रे नियमांचे पालन करणारे आहेत, हे आपण दाखवून द्यायला हवे. पोलिसांना सहकार्य करीत उत्सव साजरा करा. अशोक जाधव यांनी प्रास्ताविक तरविनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.