पुणे : लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड ते खडकी स्थानकांदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन ऑटोमेटिक सिग्नलिंगचे काम केले जाणार आहे. यामुळे रविवारी (ता.२०) पुणे – मुंबई – पुणे इंटरसिटी, पुणे – मुंबई – पुणे डेक्कन, पुणे –मुंबई –पुणे प्रगती, मुंबई –कोल्हापुर –मुंबई कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

रविवारी पुण्याहून तळेगाव, लोणावळ्याला सुटणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर शिवाजीनगरहून तळेगाव आणि लोणावळ्याला सुटणाऱ्याही काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोणावळ्यावरून पुणे आणि शिवाजीनगरला सुटणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे – जयपूर एक्सप्रेस पुण्यातून सायंकाळी ५.३० वाजता सुटण्याऐवजी ५.४५ वाजता सुटेल. दौंड – इंदौर एक्सप्रेस दौंडवरून दुपारी २ ऐवजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. रविवारी सुटणाऱ्या मुंबई – चेन्नई , लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट, मुंबई – भुवनेश्वर, मुंबई –हैदराबाद आणि शनिवारी सुटणाऱ्या त्रिवेंद्रम – मुंबई, बंगळुरु – मुंबई, ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस या गाड्यांना उशीर होणार आहे.

हेही वाचा – कुरुलकर प्रकरणात न्यायालयाने ‘एटीएस’ अधिकाऱ्यांना फटकारले

पुणे-दौंडदरम्यानही गाड्या रद्द

पुणे- दौंड रेल्वे मार्गावरील हडपसर ते लोणी स्थानकांच्या दरम्यान रविवारी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे रविवारी पुणे – दौंड – पुणे डेमू रद्द राहील.

हेही वाचा – फेसबुकवरील मैत्रिणीला भेटायला हॉटेलवर गेला अन् जाळ्यात अडकला; पुण्यातील व्यावसायिकाबरोबर घडला विचित्र प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे – राणी कमलापती हमसफर एक्स्प्रेस पुण्यातून दुपारी ३.१५ ऐवजी सायंकाळी ५ वाजता सुटेल. शनिवारी हैदराबादमधून सुटणारी हैदराबाद – हडपसर एक्सप्रेस दौंडपर्यंत धावेल. रविवारी हडपसरमधून सुटणारी हडपसर- हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी हडपसरऐवजी दौंडमधून सोडण्यात येईल ही गाडी हडपसर – दौंड- हडपसर दरम्यान रद्द राहील. शनिवारी चेन्नईतून सुटणारी चेन्नई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी दौंड – मनमाड – इगतपुरी या बदललेल्या मार्गाने चालविण्यात येईल.