नोकरी, व्यवसाय, राजकारणात मराठी टक्का कमी झाला आहे

मराठी माणूस हा शिक्षण झाल्यास नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचं तो धाडस करत नाही. मराठीचा टक्का व्यवसाय आणि राजकारणात कमी झाला आहे. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनात बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. पी.डी.पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

हेही वाचा >>> VIDEO : विश्वजीत कदम देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, भाजपात जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकांत पाटील यांनी मराठी टक्का आणि मराठी माणसाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मराठी माणूस शिक्षण घेतल्यावर नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचं धाडस करत नाही. अस स्पष्टपणे चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे. राजकारणात येणाऱ्यांची संख्या देखील कमी होत आहे. निवडणुकांची तिकीट देऊ नका असं मराठी माणूस म्हणतो. विश्लेषकांमध्ये देखील अमराठी असणाऱ्या व्यक्तींची नाव आहेत. मात्र, मराठी नाव नाही. ही मानसिकता बदकायला हवी. यासाठी पुढाकार घ्यायला हवा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर, सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, मराठी भाषा जगात श्रेष्ठ व्हावी. ती जपली जावी यासाठी सूचना देण्यासाठी पोर्टल काढणार आहे. मराठीच्या एक-एक शब्दात ऊर्जा, शक्ती आहे, असं देखील त्यांनी नमूद केलं.