जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान सौरभ नंदकुमार फराटे यांचे स्मारक डिसेंबर महिन्यापर्यंत उभारु, असे आश्वासन गुरूवारी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून देण्यात आले. फुरसुंगी येथील गंगानगर परिसरात राहणारे नंदकुमार फराटे यांना १७ डिसेंबर २०१७ रोजी वीरमरण आले होते. त्यानंतर पुण्यातील राजकारण्यांनी त्यांचे स्मारक उभारण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र, नऊ महिने उलटूनही त्यांच्या स्मारक उभारणीसाठी मुहूर्त मिळालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पार्श्वभूमीवर शहीद सौरभ फराटे यांच्या पालकांनी गुरूवारी महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेतली. हडपसर येथील गाडीतळ येथे स्मारक उभारण्यात यावे. तसेच बनकर स्कूलच्या परिसरात शहीद सौरभ फराटे यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी मंगल फराटे यांनी महापौरांकडे केली. यावेळी महापौरांनी डिसेंबरपर्यंत या स्मारक उभारु, असे आश्वासन दिले. त्यासाठी लवकरच महापौरांकडून हडपसर येथील जागेची पाहणी करण्यात येईल. २४ ऑक्टोबरला मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करुन कामावर रुजू झाल्यानंतर सीमारेषेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सौरभ फराटे यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा धाकटा भाऊदेखील सैन्यदलात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Martyr nandkumar furate memorial in hadapsar till december says mayor mukta tilak
First published on: 14-09-2017 at 20:15 IST