पुणे : नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलमधील व्यापाऱ्याकडून माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या सराइतासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.

रवींद्र जयप्रकाश ससाणे (वय ४९, रा. कल्लापुरे काॅलनी, खुळेवाडी, विमाननगर), मंगल रमेश सातपुते (वय ४०, रा. धानोरी, विश्रांतवाडी), दीपक संपत गायकवाड (वय ४०, रा. मुळा रोड, खडकी) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फिनिक्स माॅलमध्ये व्यापाऱ्याचे दुकान आहे. दुकानातील आलेल्या मालाचा ट्रक रिकामा करणाऱ्या कामगारांना आरोपी ससाणे आणि साथीदारांनी अडवले. माथाडी संघटनेचे कार्यकर्ते असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याकडे खंडणी मागितली. ट्रकमधील माल उतरविण्याचे काम आमच्या संघटनेला मिळायला पाहिजे, असे सांगून आरोपींनी व्यापाऱ्याकडून खंडणी उकळली होती.

हेही वाचा – भाजपाने राज्यातल्या उद्योगांपाठोपाठ ज्योतिर्लिंगही पळवलं? आसामच्या ‘त्या’ जाहिरातीमुळे वाद पेटला!

हेही वाचा – पुण्यात हापूस आंब्यांचे आगमन, नियमित हंगाम सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ससाणे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ससाणे आणि साथीदारांविरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक एस. एस. कोळ्ळुरे, उमेश धेंडे, सचिन जाधव, चंदन तोंडेकर यांनी तयार केला होता. पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत १३ गुंड टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई केली आहे.