सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या शंभर पदांसाठी, तर कर निरीक्षक संवर्गासाठी ६०९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही संवर्गांची जाहीर करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. उमेदवारांच्या अर्जातील दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यात, शिफारसींमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडू प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. तसेच तात्पुरती निवड यादी विविध न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी २४ ते ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढा; ‘एनएचएआय’च्या सूचना

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Merit list of results of two exams announced by mpsc pune print news amy
First published on: 24-11-2022 at 12:35 IST