पिंपरी-चिंचवडच्या मोशीमध्ये अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अश्लील हातवारे आणि डोळा मारून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अक्षय उर्फ टकल्या सुधाकर गायकवाड वय- २६ याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय उर्फ टकल्या सुधाकर गायकवाड हा अल्पवयीन ११ वर्षीय मुलीला नेहमीच छेडत होता. सोमवारी पीडित अल्पवयीन मुलगी ही किराणा घरी घेऊन जात असताना टवाळखोर अक्षयने तिचा टॉप पकडून तिला मिठीत ओढले. याअगोदरदेखील अश्लील हातवारे आणि डोळा मारून आरोपी अक्षयने तिचा विनयभंग केला होता. घाबरून अल्पवयीन मुलीने पोलिसात तक्रार दिली नव्हती.
हेही वाचा – नभांगणात ‘जीएं’च्या नावाचा तारा
सोमवारी तक्रार देण्यात आली आहे. तक्रारदार यांची नणंद आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली असता आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.