scorecardresearch

पुणे : दुचाकींच्या बॅटरी चोरणारे अल्पवयीन मुले ताब्यात; दुचाकीसह तीन बॅटरी जप्त

पुण्यात भारती विद्यापीठ, कात्रज परिसरात दुचाकींच्या बॅटरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी गस्त घालत दोन अल्पवयीन बॅटरी चोरांना पकडले आहे.

crime-2
प्रातिनिधिक छायाचित्र

दुचाकीच्या बॅटरी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन बॅटरी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आल्या.

हेही वाचा- बारामतीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला लुटले; विद्यार्थ्याला विवस्त्र करुन ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

भारती विद्यापीठ, कात्रज परिसरात दुचाकींच्या बॅटरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी दोन अल्पवयीन मुले आंबेगाव येथील गाईमुख परिसरात थांबली असून ते दुचाकीस्वारांना बॅटरीची विक्री करत असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना मिळाली. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

हेही वाचा- पुणे : दुचाकी चोरट्याला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा

चौकशीत मुलांनी दुचाकीच्या बॅटरी चाेरल्याची कबुली दिली. आंबेगाव, धनकवडी भागातून अल्पवयीन मुलांनी बॅटरी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. अल्पवयीन मुलांकडून दुचाकी तसेच तीन बॅटरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अमर भोसले, शैलेश साठे, रवींद्र चिप्पा आदींनी ही कामगिरी केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 17:36 IST