scorecardresearch

“वडिलांची उणीव भासते आहे”, लक्ष्मण जगताप यांच्या कन्येचे भावनिक आवाहन; म्हणाल्या, “ज्या प्रमाणे वडिलांवर..”

आज अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. कन्या, ऐश्वर्या या अश्विनी जगताप यांच्या सोबत असून, त्यांच्या हातात दिवंगत आमदारांचा फोटो आहे.

Laxman Jagtap daughter Aishwarya
लक्ष्मण जगताप यांच्या कन्येचे भावनिक आवाहन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे रक्त आमच्यात आहे. त्यामुळे, आमचा विजय निश्चित होईल. अद्याप आम्ही दुःखातून सावरलेलो नाहीत. आई अश्विनी जगताप यांनी नेहमीच वडिलांना पडद्यामागे राहून पाठिंबा दिला. आज त्यांची उणीव भासते आहे. वडिलांवर जनतेने भरभरून प्रेम केले, तसेच आमच्यावर करा, असे भावनिक आवाहन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या रेणुसे (जगताप) यांनी केले आहे. आज अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. कन्या, ऐश्वर्या या अश्विनी जगताप यांच्या सोबत असून, त्यांच्या हातात दिवंगत आमदारांचा फोटो आहे.

भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. भाजपाकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असून, पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत त्या आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या म्हणाल्या की, दुःखातुन आम्ही अद्याप सावरलेलो नाही. गेली तीस वर्षे आईने पडद्यामागे राहून वडिलांना पाठिंबा दिला. यामुळे आमचा विजय नक्की होईल, असे वाटते. वडिलांनी ज्या प्रकारे जनतेवर प्रेम केले तसेच प्रेम आमच्यावर करा, असे भावनिक आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा – “वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचक विधान

हेही वाचा – “:…म्हणून कसबा पोटनिवडणुकीत भाजपचं ओबीसी समीकरण”, रोहित पवारांचा टोला

ऐश्वर्या या त्यांच्या आई अश्विनी जगताप यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाल्या असून, त्यांच्या हातात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा फोटो असल्याचे पाहायला मिळत आहे. या पदयात्रेत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी झाले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 12:57 IST
ताज्या बातम्या