पुणे : मोसमी वारे अद्याप तळकोकणातच आहेत. राज्यात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी सोमवारी (१९ जून) सायंकाळीपर्यंत तरी आगेकूच केलेली नाही. मात्र, हवामान विभागाकडून मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे मोसमी वारे लवकरच पुढे वाटचाल करतील. पुढील तीन दिवसांत मोसमी वारे पुणे आणि मुंबईत दाखल होतील. विदर्भ आणि मराठवाड्यात मोसमी वारे दाखल होण्यास आणखी काहीकाळ प्रतिक्षा करावी लागेल. दरम्यान, देशाच्या अन्य भागांत मोसमी वाऱ्यांनी सोमवारी प्रगती केली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि सिक्कीमच्या उर्वरीत भागात मोसमी वारे दाखल झाले आहेत.

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुढील पाच दिवसांत राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक ४२.४, अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १८.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

Mumbai, Overcrowding ,
मुंबई : रेल्वेगाड्यांमध्ये तुडूंब गर्दी
wild elephant created havoc in the district gadchiroli three women seriously injured in attack
रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ; दोघी गंभीर
transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव