ज्येष्ठ अभिनेते व भाजपाचे पंजाबमधील गुरूदासपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सनी देओल यांनी महायुतीचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी आज (मंगळवार) हडपसर भागात रोड शो केला.

या मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेचे गटनेता वसंत मोरे रिंगणात आहेत. मागील वेळी देखील हेच उमेदवार होते. यात योगेश टिळेकर यांचा विजय झाला होता. मतदार संघातील कात्रज आणि काही भागांमध्ये मनसेचीही ताकद आहे. मात्र आतापर्यंत सेनेचे महादेव बाबर आणि त्यानंतर योगेश टिळेकर हे या मतदार संघातून विजयी झाले आहेत.

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
Kolhapur Election Hatkanangle LokSabha Constituency
उमेदवाराला विजयी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची ‘मिसळ पे चर्चा’; कोल्हापूरसाठी ठरली ‘ही’ रणनीती
Thane Lok Sabha
कोणताही उमेदवार द्या पण, तो शिवसेनेचाच असावा; नवी मुंबईतील शिबिरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लावला सूर

जागा वाटपात शिवसेनेला हा मतदार संघ मिळू न शकल्यामुळे त्या पक्षात बंडखोरी झाली होती. मात्र बंडोबांना शांत करण्यात आले. शिवसेनेत सध्या दोन गट आहेत. माजी आमदार महादेव बाबर हे नाराज असून ते प्रचारापासून लांब आहेत. मात्र एका गटाकडून टिळेकर यांना पाठिंबा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदार संघ गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते-पदाधिकारी नाराज आहेत. भाजपला रोखण्यासाठी या वेळी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप केले होते. त्याचा कितपत फायदा होईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

एकूणच हडपसर विधानसभा मतदार संघात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची ताकद असली, तरी येथील मतदारांचे शिवसेना, भाजप उमेदवाराला समर्थन राहिले आहे. गत विधानसभा निवडणुकीच्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे. मात्र राष्ट्रवादी आणि मनसेकडून चांगली लढत दिली जात असल्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे.