लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरात दहशत माजविणाऱ्या ५० गुंडांविरुद्ध गेल्या दहा महिन्यात झोपडपट्टी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशाने झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए कारवाईमुळे दहशत माजविणाऱ्या गुंडांना जरब बसली आहे.

हडपसर भागात दहशत माजविणारा गुंड अजय विजय साळुंके (वय २१, रा. ओैंदुबर पार्क, गोपाळपट्टी, मांजरी) याच्याविरुद्ध नुकतीच एमपीडीए कारवाई करण्यात आली. साळुंकेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजुरी दिली असून, साळुंखे याची रवानगी अमरावती कारागृहात करण्यात आली आहे.

आणखी वाचा-दोनशे दिवसांत दुप्पट परताव्याच्या आमिषाने पाच कोटींचा गंडा, गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासून गेल्या दहा महिन्यात ५० गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली असून, त्यांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक राजू बहिरट, सहायक फौजदार शेखर कोळी, दिलीप झानपुरे, योगेश घाटगे, संतोष कुचेकर, अविनाश सावंत, सागर बाकरे, अनिल भोंग आदींनी परिश्रम घेतले.