लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि अन्य निमशासकीय कंपन्यांना भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठीच्या रस्ते खोदाई शुल्कात वाढ करण्यात येणार आहे. भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी २ हजार ३५० रुपये प्रतिमीटर ऐवजी आता ६ हजार ९६ रुपये प्रती मीटर महापालिकेकडे जमा करावे लागणार आहेत. महापालिकेच्या पथ विभागाने तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित आहे.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खासगी मोबाईल कंपन्यांबरोबर शासकीय, निमशासकीय कंपन्यांकडून रस्ते खोदाई केली जाते. त्यासाठी ठराविक शुल्क आकारून पथ विभागाकडून परवानगी दिली जाते. त्यासाठी महापालिकेने २०१५ मध्ये रस्ते खोदाई शुल्क निश्चित केले होते. या शुल्कातून रस्ते दुरुस्तीचा खर्च वसूल केला जातो.

आणखी वाचा-विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रावर भरारी पथके; हिवाळी सत्राच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून

खासगी कंपन्यांसाठी प्रति मीटर १२ हजार १९२ रुपये दर असून, महावितरणसह अन्य शासकीय आणि निमशासकीय कंपन्यांसाठी प्रती मीटर २ हजार ३५० रुपये शुल्क आकारले जाते. तसेच एचडीडी तंत्रज्ञानाने रस्ते खोदाई, पीट्सह रस्ते खोदाई यासाठी निरनिराळे शुल्क आकारले जाते. गेल्या महिन्यात पालकमंत्री अजित पवार यांनी विकासकामांसंदर्भात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी महापालिका आणि महावितरण यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. या बैठकीत पवार यांनी महावितरणला मूळ खोदाई शुल्कात सवलत देण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार पथ विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे. स्थायी समितीपुढे तो मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून, त्यावर पुढील बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.