पुण्यात आणखी एक हत्या; व्याजाचे पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने वार करुन केलं ठार

मूळ रकमेवरील एक महिन्याच व्याज न दिल्याने पुण्यातील नवले ब्रीजजवळ ४३ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने दोघांनी हत्या केल्याची घटना

Pune Crime, Pune Murder,
मूळ रकमेवरील एक महिन्याच व्याज न दिल्याने पुण्यातील नवले ब्रीजजवळ ४३ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने दोघांनी हत्या केल्याची घटना (प्रातिनिधिक)

मूळ रकमेवरील एक महिन्याच व्याज न दिल्याने पुण्यातील नवले ब्रीजजवळ ४३ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने दोघांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद शिवाजी आवारे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रकाश शिंदे आणि त्याच्या एका साथीदाराने मिळून ही हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे यांनी प्रकाश शिंदेंकडून १ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. मात्र शरद आवारे यांनी नोव्हेंबर महिन्याचं व्याज दिले नव्हते. रविवारी रात्री आरोपी प्रकाश शिंदे आणि शरद आवारे हे दोघे नवले ब्रिज येथील सर्व्हिस रोडवर भेटले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यामध्ये आरोपी प्रकाश आणि त्याच्या साथीदाराने शरद आवारेंवर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि घटनास्थळावरुन फरार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शरद आवारे यांनी जवळील रूग्णालयात दाखल केले केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Murder near nawale bridge in pune svk 88 sgy

ताज्या बातम्या