पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी शड्डू ठोकला आहे. बालेकिल्ला हा एकट्याचा नसतो, तो नागरिकांचा असतो. शहरातील नागरिकांचे प्रेम जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही दडपशाही किंवा ताकदीचा वापर करत नाही, यामुळे लोक जास्तीत जास्त आमच्याकडे वळतील दडपशाहीकडे नाही, असा टोलादेखील त्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> बारामतीतून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा; रोहित पवार म्हणाले, ‘चर्चेला महत्व द्यायचे…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरातील वातावरण हे शरद पवार गटाने ढवळून काढले आहे. त्यामुळे अजित पवार गट मागे पडताना दिसत आहे.  रोहित पवार म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नेहमी बारामती लोकसभा जिंकण्याबाबत वक्तव्य करावं लागत आहे. बारामतीमध्ये त्यांना यश मिळणार नाही, त्यामुळे बावनकुळे हे घाबरले आहेत. त्यावर वारंवार वक्तव्य करत आहेत, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. मीरा बोरवणकर यांच्या प्रश्नावर रोहित पवारांनी अजित पवारांची भाजप ताकद कमी करत असून मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांना उत्तर द्यावं लागत आहे. याच्यामागे षड्यंत्र असू शकतं, असंच स्पष्टपणे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा निघणार आहे, या संदर्भातदेखील त्यांनी माहिती दिली.