..तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आले ; शरद पवार यांची कबुली | ncp leader sharad pawar sushilkumar shinde police department election ticket lawyer Award pune | Loksatta

..तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आले ; शरद पवार यांची कबुली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे या दोघांची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. याची प्रचिती पवार यांनी सांगितलेल्या या किश्श्याने आली.

..तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आले ; शरद पवार यांची कबुली

पुणे : ‘माझ्या सांगण्यावरुन सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले होते खरे. पण, त्यांना तिकीट मिळवून देऊ शकलो नाही. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले’ अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे या दोघांची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. याची प्रचिती पवार यांनी सांगितलेल्या या किश्श्याने आली. त्यावेळच्या सरकारमध्ये मी गृहमंत्री झालो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवले. आपली जी काही प्रकरणे असतील, तर त्या शिंदे यांना द्यायचे ठरवले. पुढे झालेल्या निवडणुकीत शिंदे यांना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर त्यांनी मागे बघून पाहिल नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : शिंदेंकडून राष्ट्रवादीला ऑफर आलेली का? अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांनीच केला खुलासा, म्हणाले…

पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे लोक ठराविकच असतात. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

संबंधित बातम्या

राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांचा…”
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
पुणे: हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्याच्या संचालकांना दिल्ली पोलिसांची नोटिस
पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार ; तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”