पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. थोपटे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमध्ये तटकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार या नणंद-भाजवयीमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. हे तगडे आव्हान ध्यानात घेत शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेत सुप्रिया सुळे यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेत अजित पवार दादागिरी करत असल्याचे त्यांच्या कानावर घातले.

Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
congress and bjp campaign in solapur lok sabha constituency
सोलापुरात काँग्रेस व भाजपचा प्रचार शिगेला 
DCM Devendra Fadnavis On Congress
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा
Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका

हेही वाचा…शिवतारेंनी भूमिका बदलली नाही तर आम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाहीत- आमदार अण्णा बनसोडे

शरद पवार, विजय शिवतारे यांच्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. अजित पवार यांचे सख्खे भाऊ त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे एकीकडे मतदारसंघातील अडचणी वाढत असताना अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या माध्यमातून थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत आहे.