scorecardresearch

Gram Panchayat Election Result 2022: पुण्याच्या मावळमध्ये ६ ठिकाणी राष्ट्रवादीचा डंका; भाजपा तीन ठिकाणी विजयी

Pune Gram Panchayat Election 2022 Result : पुण्याच्या मावळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. मावळमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Gram Panchayat Election Result 2022: पुण्याच्या मावळमध्ये ६ ठिकाणी राष्ट्रवादीचा डंका; भाजपा तीन ठिकाणी विजयी
पुण्याच्या मावळमध्ये ६ ठिकाणी राष्ट्रवादीचा डंका; भाजपा तीन ठिकाणी विजयी

पुणे : पुण्याच्या मावळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली आहे. नऊ ग्रामपंचायतीसाठी झालेली निवडणुकीचा निकाल आज हाती आला असून राष्ट्रवादी पक्षाला ६ ठिकाणी विजय मिळाला आहे. तर, भाजपला ३ ठिकाणी विजय मिळाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरून भोयरे आणि निगडे येथे प्रचार केला होता. पैकी, निगडे येथे त्यांना हार पत्करावी लागली तर भोयरे येथे आब राखण्यात भाजपाला यश आले आहे.

पुण्याच्या मावळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. मावळमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नऊ पैकी एक शिरगाव येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली तिथं राष्ट्रवादीला यश मिळाले. मावळमध्ये उर्वरित आठ ग्रामपंचायतीसाठी ७९.८० टक्के मतदान झालं होतं. आठ ग्रामपंचायतीची मतमोजणी आज होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ यश मिळालं आहे.

हेही वाचा: Maharashtra Assembly Winter Session Live Updates: अजित पवारांनी विधानसभेत केला ‘कोयता गँग’चा उल्लेख; म्हणाले, “हे कुठेही जातात आणि…!”

राष्ट्रवादीने सहा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवल असून तीन ठिकाणी भाजपाला समाधान मानावं लागलं आहे. मावळमधील भोयरे आणि निगडे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केला होता. भोयरे या ठिकाणी भाजपाला यश मिळाले तर निगडे येथे भाजपाचा पराभव झाला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाला सपशेल अपयश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना खाते देखील उघडता आले नाही.

मावळ तालुक्यात कोण कुठे सरपंच झाला पहा

1) देवले ग्रामपंचायत
वंदना बाळू आंबेकर- सरपंच, राष्ट्रवादी
2) कुणेनामा ग्रामपंचायत
सुरेखा संदीप उंबरे- सरपंच, भाजपा<br>3) इंदोरी ग्रामपंचायत
शशिकांत राजाराम शिंदे- सरपंच, राष्ट्रवादी
4) वरसोली ग्रामपंचायत 
संजय खांडेभरड- सरपंच, राष्ट्रवादी
5) निगडे ग्रामपंचायत (भाजप नेते  चंद्रकांत पाटील प्रचारासाठी आले तरी)
भिकाजी मुक्ताजी भागवत- सरपंच, राष्ट्रवादी
6) सावळा ग्रामपंचायत 
मंगल नागु ढोंगे- सरपंच, राष्ट्रवादी
7) भोयरे ग्रामपंचायत (चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केला होता)
वर्षा अमोल भोईरकर- सरपंच, भाजपा
8) गोडुंबरे ग्रामपंचायत
निशा गणेश सावंत- सरपंच, भाजपा
9) शिरगाव ग्रामपंचायत- बिनविरोध
प्रवीण साहेबराव गोपाळे- राष्ट्रवादी

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 13:22 IST

संबंधित बातम्या