Maharashtra Political Headlines, Winter Session Of Maharashtra Assembly Nagpur Day 2: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली. दोन्ही बाजूंनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात घोषणाबाजी करून आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे आज दिवसभरात कामकाज वादळी होणार हे दिवसाच्या सुरुवातीलाच स्पष्ट झालं होतं.

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics
Maharashtra News : “उद्धव ठाकरे तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल तर….”, आशिष शेलारांचं खुलं आव्हान
PM Modi Public Meeting in Chandrapur for Sudhir Mungantiwar Lok Sabha Election 2024
PM Narendra Modi in Chandrapur : “कमिशन द्या नाहीतर प्रकल्प थांबवा असं उद्धव ठाकरेंच्या मविआ सरकारचं धोरण होतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
chandrapur, sudhir mungantiwar, kishor jorgewar, support, election, will not help, in future, bjp, lok sabha 2024, maharashtra politics, marathi news,
सुधीर मुनगंटीवार म्हणतात,’ जोरगेवारांनी आता मदत केली नाही तर मी त्यांना…
Live Updates

Maharashtra News Today, Winter Session Of Maharashtra Assembly Live: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सर्व अपडेट्स

17:09 (IST) 20 Dec 2022
मला आज एका गोष्टीचं फार दु:ख झालं - आदित्य ठाकरे

मला दु:ख झालंय. जेव्हा भुजबळांनी एनआयटी जमिनीविषयीचा मुद्दा मांडला, तेव्हा योगेश सागर यांनी समोरून दोन वेळा भुजबळांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं म्हटलं. आम्ही त्यांना विचारलं की वय झालं म्हणून तुम्ही असं कुणालाही काहीही म्हणू शकता का? तेव्हा सगळा सत्ताधारी बेंच आमच्या अंगावर आला. मी फक्त एवढंच म्हणत होतो की त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत. कुणीही सदस्य असो, राजकारण कुठल्या पातळीपर्यंत खाली न्यायचं, हे ठरलं पाहिजे. मला त्यांचं बोलणं योग्य वाटलं नाही, म्हणून मी तिथे आवाज उठवला. सत्ताधारी पक्षातून योगेश सागर यांची बाजू घेतली गेली याचं मला दु:ख वाटलं. एवढं घाणेरडं वैयक्तिक राजकारण कधीही झालं नव्हतं.

16:20 (IST) 20 Dec 2022
आम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणारे लोक नाहीत - देवेंद्र फडणवीस

"छगन भुजबळांनी वरच्या सभागृहाचा उल्लेख केला, तिथे पूर्णपणे मी खुलासा केला आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांवर चुकीचे आरोप लावणे योग्य नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. यानिमित्ताने भुजबळसाहेब मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, ८३ कोटी वगैरे आस्मानी आकडे पूर्णपणे चुकीचे आहेत. मी वरच्या सभागृहात उत्तर दिलंय, येथेही देतो. आम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणारे नाहीत," - देवेंद्र फडणवीस

16:09 (IST) 20 Dec 2022
मुख्यमंत्र्यांनीही रेवड्या वाटल्या का? - छगन भुजबळ

"राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ८३ कोटी रुपयांचा भूखंड केवळ २ कोटी रुपयांना दिला. म्हणून वरिष्ठ सभागृहातही गदारोळ सुरू आहे. आपलं सभागृहही सर्वात मोठं आहे. येथे लोकप्रतिनिधी सर्वात जास्त आहेत. त्यामुळे ८३ कोटींचा भूखंड अवघ्या दोन कोटींत कसा दिला? हा भ्रष्टाचार नाही का? की यांनीही रेवड्या वाटल्या" - छगन भुजबळ

15:05 (IST) 20 Dec 2022
आफताबचे ७० तुकडे केले तरी सगळ्यांना समाधान वाटेल - अजित पवार

आफताब पूनावालाला फाशीचीच शिक्षा द्यावी लागेल. आपल्याकडे जर असा काही कायदा असता की त्यानं श्रद्धाचे ३५ तुकडे केले, तसे याचेही ३५ तुकडे केले पाहिजेत.. ३५ ऐवजी ७० तुकडे केले तरी सगळ्यांना समाधान वाटेल असा हा नालायक माणूस निघाला आहे. त्यासंदर्भात सरकारने गृहमंत्र्यांशी बोलून या प्रकरणाचा कसा लवकरात लवकर निकाल लागेल आणि त्याला कडक शासन होईल याबाबत आपण कार्यवाही करणार का? - अजित पवार

14:53 (IST) 20 Dec 2022
नागपुरातील NIT भूखंड मुद्द्यावरुन अधिवेशनात गदारोळ; उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. या मुद्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.

सविस्तर बातमी

14:29 (IST) 20 Dec 2022
लव्ह जिहादसंदर्भात कायदा करण्याची सरकारची मानसिकता - देवेंद्र फडणवीस

काही राज्यांनी लव्ह जिहादच्या बाबत कायदे केले आहेत. मी जाणीवपूर्वक सभागृहाला सांगतो, की लव्ह जिहाद हा विषय सर्वात आधी केरळमध्ये बाहेर आला. हे नाव केरळच्या सरकारने त्याला दिलं आहे. हे कुठल्या धर्माच्या विरोधात कार्यवाही आहे असं नाहीये. पण अशा घटना घडतायत. म्हणून वेगवेगळ्या राज्यांनी याबाबत जी भूमिका किंवा कायदे केले आहेत, त्यांचा अभ्यास करून आपल्याकडे यासंदर्भात प्रभावी कायदा करण्याची गरज असेल, तर तो करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. षडयंत्राचा भाग म्हणून कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आवश्यकता असेल, तर राज्य सरकार नक्कीच तसा प्रयत्न करेल.

14:29 (IST) 20 Dec 2022
षडयंत्राचा भाग म्हणून अशा विवाहाच्या काही घटना घडल्या - फडणवीस

यावर पुढचा उपाय म्हणून आपण सांगितलंय की अशा परिस्थितीत एखाद्या महिलेची तक्रार आल्यावर त्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. किमान तिला बोलवून तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ४० मोठे मोर्चे निघाले. यात लव्ह जिहादबाबत कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली गेली. इंटरफेथ मॅरेजला सरकारचा कोणताही विरोध नाही. मात्र, गेल्या काही काळात जाणीवपूर्वक षडयंत्राचा भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये असे विवाह केले जात आहेत. वर्ष-दीड वर्षात त्या मुलीला त्रास दिला जातो. अशा घटना मोठ्या प्रमाणावर बाहेर येताना दिसत आहेत.

14:28 (IST) 20 Dec 2022
श्रद्धा वालकर प्रकरणात राजकीय दबाव दिसून आला नाही - देवेंद्र फडणवीस

आत्तापर्यंतच्या तपासात या प्रकरणात कोणत्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. मात्र, तिने तक्रार परत का घेतली, याची चौकशी आपण करत आहोत. त्याचसोबत तिने तक्रार करणं आणि ती परत घेणं यात एका महिन्याचा कालावधी गेला. २३ तारखेला तिने तक्रार केली आणि पुढच्या महिन्याच्या १९ तारखेला तक्रार परत घेतली. यादरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली? तेव्हा जर तपास केला असता, तर हा प्रकार टाळता आला असता. त्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आपण याची माहिती घेत आहोत की इतके दिवस त्यांनी कारवाई का केली नाही?

14:23 (IST) 20 Dec 2022

श्रद्धा वालकर प्रकरण मानवतेला काळिमा फासणारं आहे. एखादा व्यक्ती इतका क्रूर कसा होऊ शकतो की तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि त्याच फ्रीजमधून कोल्ड्रींक काढून प्यायचं. - देवेंद्र फडणवीस

14:20 (IST) 20 Dec 2022
लव्ह जिहादविरोधात कायदा करणार का - अतुल भातखळकर

त्याचबरोबर ज्याला लव्ह जिहाद म्हटलं जातं, अशी प्रकरणं राज्यात काही जिल्ह्यांत समोर आली आहेत. त्यामुळे लव्ह जिहादला विरोध करणारा एखादा कायदा करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे का? - अतुल भातखळकर

14:19 (IST) 20 Dec 2022
त्या वेळच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा पोलिसांवर दबाव होता का - अतुल भातखळकर

ही घटना ज्या काळात घडली, त्या काळात अमरावतीला कोल्हेंची हत्या झाली. आज चार्जशीटमध्ये तबलिगी जमातीचं नाव आलं. त्यावर लोकांनी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी हा तपास हाती घेतल्यानंतर हा अँगल हाती आला. याकूब मेमनची तर यांनी अडीच वर्षांत कबरच सजवली. त्यामुळे श्रद्धाचा तक्रार अर्ज मागे घेण्यामध्ये त्यावेळच्या सरकारमधल्या शीर्षस्थ नेतृत्वाचा पोलिसांवर दबाव होता का? या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले जातील का? - अतुल भातखळकर

14:14 (IST) 20 Dec 2022
अतुल भातखळकरांचा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून सरकारला सवाल!

श्रद्धा वालकरची फक्त हत्याच केली गेली नाही, तर तिच्या देहाचे ३५ तुकडे केले गेले. ते तुकडे आफताबनं स्वत:च्या घरात फ्रीजमध्ये ठेवले आणि हळूहलू त्यांची विल्हेवाट लावली. असं म्हटलं गेलं की वसईत राहत असताना तिने २०२०मध्ये पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. पण नंतर तिने तो अर्ज मागे घेतला. मुळात तिच्या वडिलांनी हे जाहीरपणे सांगितलंय की त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. आफताबच्या घरच्यांनीही तिच्यावर दबाव आणला होता. त्यामुळे हा अर्ज कदाचित मागे घेतला गेला असेल. पण पोलिसांनी कारवाई केली नाही, यामागे काही राजकीय दबाव होता का? - अतुल भातखळकर

13:57 (IST) 20 Dec 2022
एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत केला लिओनेल मेस्सीचा उल्लेख!

दोन्ही सभागृहाच्या कामाच्या तासांची प्रसिद्धी कमी होते, पण काम बंद पडलं, तर प्रसिद्धी जास्त होते. फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मेस्सीनं कमाल केली. पण मेस्सी एका दिवसात घडलेला नाही. अर्जेंटिनाचा जगज्जेता संघ उभा करण्यात जिद्द, चिकाटी, मेहनत अशा सगळ्याच गोष्टी आहेत. अशी उदाहरणं अनेक आहेत. कोणत्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी, मेहनत या गोष्टी आपण टाळू नयेत - एकनाथ शिंदे

13:33 (IST) 20 Dec 2022
डांबर घोटाळ्यासंदर्भात चौकशी केली जाईल - देवेंद्र फडणवीस

आपल्याला कुणालाही टार्गेट करायचं नाहीये. पण यासंदर्भात जी काही चौकशी आवश्यक असेल, ती केली जाईल - देवेंद्र फडणवीस

13:32 (IST) 20 Dec 2022
गेल्या २५ वर्षांत रस्त्यांच्या डांबरात खाल्लेल्या पैशांची चौकशी व्हावी - आशिष शेलार

२२ हजार कोटींचं डांबर कुणी खाल्लं, याची माहिती आहे. त्याची चौकशी करायची असेल, तर ती व्हायला हवी. गेल्या २५ वर्षांत डांबराचे जेवढे रस्ते झाले, त्यात किती पैसे खाल्ले, त्याची चौकशी व्हायला हवी - आशिष शेलार

13:23 (IST) 20 Dec 2022
पुण्याच्या मावळमध्ये ६ ठिकाणी राष्ट्रवादीचा डंका; भाजपा तीन ठिकाणी विजयी

पुणे : पुण्याच्या मावळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली आहे. नऊ ग्रामपंचायतीसाठी झालेली निवडणुकीचा निकाल आज हाती आला असून राष्ट्रवादी पक्षाला ६ ठिकाणी विजय मिळाला आहे. तर, भाजपला ३ ठिकाणी विजय मिळाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरून भोयरे आणि निगडे येथे प्रचार केला होता. पैकी, निगडे येथे त्यांना हार पत्करावी लागली तर भोयरे येथे आब राखण्यात भाजपाला यश आले आहे. बातमी वाचा सविस्तर

13:01 (IST) 20 Dec 2022
शंभूराज देसाई, तुम्ही सीनिअर आहात - अजित पवार

सभागृहातलं वातावरण व्यवस्थित राहण्यासाठी आदित्य ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला. पण त्यावर उत्तर देण्याऐवजी अजून काहीतरी मुद्दे उपस्थित केले गेले. शंभूराज देसाई, आपण ज्येष्ठ आहात. काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सभागृह चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाती आहे - अजित पवार

13:00 (IST) 20 Dec 2022
आदित्य ठाकरेंनी सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती घेतली - शंभूराज देसाई

सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. जे काही थोडे शिल्लक सेनेमध्ये आहेत. त्यांना त्या रस्त्याचा वापर करावा लागू नये, एवढी तरी काळजी त्यांनी आता घेतली पाहिजे - शंभूराज देसाई यांचा टोला

12:56 (IST) 20 Dec 2022

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

12:50 (IST) 20 Dec 2022
अडीच वर्षांत खड्डे का बुजवले गेले नाहीत?

गेल्या अडीच वर्षांत खड्डे का बुजवले गेले नाहीत, याचीही चौकशी केली जाईल - शंभूराज देसाई

12:45 (IST) 20 Dec 2022

समृद्धी महामार्गाच्या एक्झिट पॉइंटवर पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. त्यासाठी परिवहन विभागाला अधिकची वाहनं लागली, तर तीही उपलब्ध करून दिली जातील - शंभूराज देसाई

12:44 (IST) 20 Dec 2022
समृद्धीवर १५० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा निश्चित

समृद्धी महामार्गाच्या सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून ताशी १५० किलोमीटर इतकी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली होती पण आता तिथे १२० किमी वेगमर्यादा आपण घालून दिली आहे. यावर वेग जाऊ नये, यासाठी स्पीडगनची व्यवस्था करण्यात आली आहे. जेव्हा असा वेग वाढेल, तेव्हा पुढच्या टोलनाक्याला त्या वाहनाला थांबवलं जाईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर यासंदर्भात प्रयोग करण्यात आला आहे. - शंभूराज देसाई

12:44 (IST) 20 Dec 2022
सांगली: आटपाडी पोलीस ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी; पोलीसांचा लाठीमार

आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुक कारणावरून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटात वादावादी आणि मारामारी झाली. रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी झालेल्या वादाबाबत तक्रार देण्यासाठी सोमवारी सकाळी आटपाडी पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी झाली. बातमी वाचा सविस्तर

12:43 (IST) 20 Dec 2022

गेल्या अडीच वर्षांत खड्डे का पडले, खड्डे पडल्यानंतर ते का बुजवले गेले नाहीत, रस्ते बनवल्यानंतर लगेच त्याला खड्डे पडले का याची माहिती घेतली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे दुरुस्त करण्यासाठी कार्यवाही केली जाईल - शंभूराज देसाई

12:42 (IST) 20 Dec 2022
समृद्धी महामार्गावरील अपघातांचा मुद्दा विधानसभेत चर्चेला...

समृद्धी महामार्गासाठी रस्ते सुरक्षेचे नियम काय असणार आहेत, याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. शिवाय, महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे जे अपघात होत आहेत, त्याबाबत सरकारची काय भूमिका आहे, यावर उत्तर द्यावं - नाना पटोले

12:37 (IST) 20 Dec 2022
विधान परिषद कामकाज अपडेट...

विधापरिषद कामकाज - प्रश्वोत्तराचा तास सुरु झाला असतांना नागपूर जमीन घोटाळ्याचा मुद्दा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी काढला, त्यावर गोंधळ होत कामकाज १५ मिनीटा करता तहकूब करण्यात आलं होतं.

12:31 (IST) 20 Dec 2022
सरकार म्हणून सीमाभागातील लोकांच्या पाठिशी आपण - मुख्यमंत्री

सीमाप्रश्नी पहिल्यांदाच इतक्या वर्षांनंतर केंद्रानं आणि गृहमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला आहे. आपलं सभागृह त्याच्या पाठिशी एकमताने आहोत. ज्या लोकांना अटक केली होती, त्यांना तातडीने सोडण्यात आलं. जयंतराव, तुमच्या सांगलीतला जत तालुक्यासाठी २ हजार कोटींचा म्हैसाळ प्रकल्प मंजूर केला आहे. आपण सरकार म्हणून त्यांच्या पाठिशी उभे आहोत.

12:28 (IST) 20 Dec 2022
कोयता गँगचा बंदोबस्त करावा - अजित पवार

माझी सरकारला विनंती आहे, की हे कुठल्याही परिस्थितीत थांबलं पाहिजे. पोलीस दलाच्या आपण मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. तो तुमचा अधिकार आहे. पण त्या सगळ्या अधिकाऱ्यांना हे कोयता गँगचे प्रकार होता कामा नयेत, असे आदेश द्यावेत. हवं तर त्यांना मोक्का लावा, तडीपार करा, जी कुठली कठोर कारवाई करायची असेल ती करा. हे कुठल्या पक्षाशी संबंधित नसतात. त्यामुळे यांना पक्ष वगैरे काही नाही. फक्त दहशत निर्माण करणं हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त केला गेलाच पाहिजे. कृपया याची नोंद सरकारने घ्यावी.

12:26 (IST) 20 Dec 2022
राज्याच्या काही भागात कोयता गँग सक्रीय - अजित पवार

राज्याच्या विविध भागांत अशा काही घटना घडल्या आहेत. एक कोयता गँग नावाची गँग निर्माण झाली आहे. ते जातात आणि दहशत निर्माण करतात. काचा फोडतात, महिलांना दमदाटी करतात. हॉटेलमध्ये जाऊन खातात, बिलं देत नाहीत.मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडतात. राज्याच्या शहरी भागात हे मोठ्या प्रमाणावर होतंय. जी मुलं पकडली जातात, ती कॉलेजची मुलं आहेत. कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी बघतात, चित्रपट बघतात आणि असा गोंधळ घालतात.

12:23 (IST) 20 Dec 2022
राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

ग्रामपंचायत निवडणुकीतील कामगिरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला आनंद आहे आणि हा आकडा वाढवत जाऊ," असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

12:18 (IST) 20 Dec 2022
सत्ताधारी-विरोधकांची संयुक्त बैठक होणार - मुख्यमंत्री

विकासकामे स्थगितीच्या मुद्द्यावर अधिवेशन संपण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांची संयुक्त बैठक होणार - मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन

12:17 (IST) 20 Dec 2022
नागपूर: ५० आमदार एकदम ओके, घरी बसलेले माजले बोके'; विरोधकांच्या घोषणेला सत्ताधाऱ्यांचे जोरदार प्रत्युत्तर

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षाने ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. त्याला लगेच सत्ताधारी पक्षानेही '५० आमदार एकदम ओके, घरी बसलेले माजले बोके' म्हणत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीची बैठक झाल्यावर विरोधी पक्षाने विधान भवन परिसरातील काँग्रेस कार्यालयातून विधान सभेच्या पायरीवर मोर्चा काढला.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 20 Dec 2022
विधानसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात...

विधानसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात...

12:13 (IST) 20 Dec 2022
शिवसेना-वंचित युती : परिवर्तनाची नांदी

लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांना तसा अजून दीड-पावणे दोन वर्षांचा अवधी आहे. परंतु देशपातळीवर आणि राज्यातीलही राजकीय वातावरण आताच तापू लागले आहे. खरे म्हणजे महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर आश्चर्यकारक व धक्कादायक अशा राजकीय उलथापालथी झाल्या. बातमी वाचा सविस्तर

11:35 (IST) 20 Dec 2022
शेखर माने : सामाजिक भान असलेला कार्यकर्ता

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका. बातमी वाचा सविस्तर

11:34 (IST) 20 Dec 2022
नागपूर: पहाटे तीन वाजताच्या सुमारास धावत्या बसमध्ये एकटी तरुणी झोपेत असताना झाले असे की…

बुलढाण्यातून खासगी बस (ट्रव्हल्स)मध्ये झोपेत असलेल्या १७ वर्षीय तरुणीवर बसच्या कंडक्टरने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. झोपेतून जागे झालेल्या तरुणीने आरडाओरड करीत प्रतिकार केला. त्यानंतर बसमधील अन्य प्रवाशांनी कंडक्टरला चोप दिला. बस थेट सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आली व याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज राजेंद्र सावंत (३०, रा. खामगाव, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर

11:33 (IST) 20 Dec 2022
दिवाळे वाजले खरे, पण क्रिप्टोकरन्सीची भीती नको…!

अमेरिकेतील ‘एफटीएक्स’ या क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलन विनिमय केंद्राचे दिवाळे वाजले. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर बंदी घालावी तसेच ही केंद्रे प्रतिबंधित करावीत यासारखी टोकाची भूमिका घेण्यात आली. तथापि, अशा आर्थिक घोटाळ्यामुळे संपूर्ण क्रिप्टोकरन्सी उद्योगावरच बंदी घालावी ही मागणी रास्त आहे का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. बातमी वाचा सविस्तर

11:33 (IST) 20 Dec 2022
सोलापूरात कारखान्याच्या चिमणीच्या माध्यमातून राजकीय चढाओढ

सोलापूर : विमानसेवा सुरू करण्यासाठी कथित अडथळा ठरलेली सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडावी म्हणून सोलापुरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून त्याविरोधात सिध्देश्वर कारखाना बचाव कृती समितीनेही प्रतिआंदोलन सुरू केले आहे. विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंचने सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. परंतु सिध्देश्वर बचाव कृती समितीच्या आक्रमक प्रतिआंदोलनामुळे वातावरण तापत गेले आहे. बातमी वाचा सविस्तर

11:32 (IST) 20 Dec 2022
विधानभवन परिसरात गर्दीत धक्का लागून चोपदार पडले, मुख्यमंत्र्यांनी…

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधान भवन परिसरातील शिवसेना कार्यालयातून विधानसभेच्या दिशेने निघाले. दरम्यान, गर्दीत मुख्यमंत्र्यांसह त्यांच्यासोबत चालणारे चोपदार खाली पडले. एकनाथ शिंदेने लगेच हात देऊन त्यांना उचलून विचारणा केली. त्यानंतर चोपदाराचा हात पकडून ते कार्यालयाच्या बाहेर आले. बातमी वाचा सविस्तर

11:30 (IST) 20 Dec 2022
विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब

विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब

11:12 (IST) 20 Dec 2022
तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला, तरी... - फडणवीस

तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला, तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आवश्यक त्या स्थगित्या उठवल्या आहेत. जिथे तरतुदी जास्त आहेत, तिथल्या स्थगित्या कायम ठेवल्या आहेत. लवकरच त्यासंदर्भातही योग्य निर्णय आम्ही घेऊ. आवश्यक असेल, तिथे सत्तारुढ पक्ष आहे की विरोधी पक्ष आहे असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. गरज असेल, तर मी तुम्हालाही त्याची माहिती पाठवतो. कुणावरही अन्याय करण्याचं कारणच नाही.

11:10 (IST) 20 Dec 2022
शेवटच्या काळात वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही - देवेंद्र फडणवीस

माझ्या स्वत:च्या मतदारसंघातली, सगळ्यांच्या मतदारसंघातली कामं तुम्ही रोखली होती. अडीच वर्ष भाजपाच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवली नाही. ज्या काही स्थगित्या दिल्या होत्या. त्यातल्या ७० टक्के स्थगित्या आम्ही उचलल्या आहेत. ३० टक्के स्थगित्या यासाठी कायम ठेवल्या आहेत, की शेवटच्या काळात वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही. जिथे २ हजार कोटींची तरतूद आहे. तिथे ६ - ६ हजार कोटी रुपये वाटले आहेत. त्याच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. हे पैसे आणायचे कुठून? त्यामुळे आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपय्या अशी अवस्था असेल, तर तशा प्रकारे हा निधी मंजूर होईल.

11:08 (IST) 20 Dec 2022
काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो - देवेंद्र फडणवीस

तुम्ही सात सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा आमची सगळी विकासकामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं.

11:07 (IST) 20 Dec 2022
विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात...

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृहात गदारोळ झाला.

अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

11:03 (IST) 20 Dec 2022
दुसऱ्या दिवसाची सुरुवात घोषणाबाजीने!

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी. महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका!